भारत

Indian Railway: रेल्वे प्रवासात स्वर्गाचा अनुभव अनुभवायचा आहे का? ‘या’ रेल्वे मार्गावरून करा प्रवास

Published by
Ajay Patil

Indian Railway:- भारतीय रेल्वे ही प्रवासी वाहतुक आणि मालवाहतुकीच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाची असून भारताच्या कानाकोपऱ्यामध्ये रेल्वेचे जाळे विस्तारलेले आहे. दररोज लाखोच्या संख्येने प्रवासी रेल्वेच्या माध्यमातून प्रवास करतात. भारतातील अनेक दुर्गम भागात देखील रेल्वेचे जाळे विकसित करण्यात आलेले असून  ज्या ठिकाणी अजून रेल्वे नाही अशा ठिकाणी देखील नवीन रेल्वे मार्गांचे काम मोठ्या प्रमाणावर सुरू करण्यात आलेले आहे.

महाराष्ट्राचा आणि एकंदरीत भारताचा विचार केला तर नैसर्गिक साधन संपत्तीच्या बाबतीत देखील खूप मोठ्या प्रमाणावर विविधता असून भारतातील अनेक रेल्वे मार्ग अनेक डोंगर रांगांमधून देखील तयार करण्यात आलेले आहेत व अशा परिसरातून रेल्वेने प्रवास करताना आपल्याला खूप मोठ्या प्रमाणावर निसर्गाची अनुभूती अनुभवायला मिळतेच परंतु अशा ठिकाणी प्रवास करताना तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणावर स्वर्गात फिरल्यासारखा आनंद अनुभवता येतो.

भारतामध्ये असे काही रेल्वे मार्ग आहेत ज्या माध्यमातून जर प्रवास केला तर तुम्हाला स्वर्गात फिरण्याची अनुभूती मिळते. त्यामुळे तुम्हाला देखील रेल्वेतून प्रवास करताना निसर्ग सौंदर्य न्याहाळत आणि जणू काही स्वर्गात फिरत आहेत असा आनंद मिळवायचा असेल तर  खाली दिलेल्या काही रेल्वे मार्गावरून तुम्ही प्रवास करून हा आनंद घेऊ शकता.

 या रेल्वे मार्गावरून प्रवास केला तर मिळेल स्वर्गात फिरल्याचा आनंद

1- कांगडा व्हॅली रेल्वे कांगडा व्हॅली रेल्वे मार्ग हा भारतातील एक महत्त्वाचा रेल्वे मार्ग असून तो सर्वोत्तम रेल्वे मार्गांपैकी एक आहे. या रेल्वे मार्गावरून प्रवास करताना तुम्हाला पर्वतांचे मनमोहक दृश्य आणि निसर्ग सौंदर्य न्याहाळत  प्रवास करण्याची संधी मिळते.

2- कोकण रेल्वे महाराष्ट्रातील कोकण परिसराला निसर्गाने भरभरून दिले असून हा एक समृद्ध निसर्ग सौंदर्याने नटलेला परिसर आहे. याच परिसरातून कोकण रेल्वे मार्गाचा विस्तार करण्यात आला असून मुंबई ते कर्नाटक राज्यातील मंगळूर पर्यंत हा रेल्वे मार्ग विस्तारला आहे.

या मार्गावरून प्रवास करताना तुम्हाला निसर्ग सौंदर्य बघत व निसर्गसौंदर्याचा आनंद घेत प्रवास करता येतो. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे कोकण रेल्वे मार्गाने प्रवास करताना तुम्ही अथांग पसरलेल्या अरबी समुद्र आणि पश्चिम घाट पाहत  प्रवास करता येतो.

3- दार्जिलिंग हिमालयन रेल्वे ही एक टॉय ट्रेन असून तिचा प्रवास हा निसर्ग संपन्न अशा पर्वतांमधून होतो. या ट्रेनने प्रवास करताना तुम्हाला कांचनजंगा पर्वताचा नयनरम्य सौंदर्याचा अनुभव घेता येतो. युनोस्कोच्या ज्या काही जागतिक वारसा स्थळांच्या यादी आहे त्यामध्ये या नॅरोगेज रेल्वेचा समावेश करण्यात आलेला आहे.

या मार्गावरून प्रवास करताना तुम्हाला अनेक प्रकारचे निसर्ग सौंदर्याची भुरळ पडते. या ठिकाणचे निसर्ग सौंदर्य पाहण्यासाठी देश-विदेशातून पर्यटक या ठिकाणी येतात. तसेच चहाच्या बागांचे देखील दर्शन तुम्हाला या ठिकाणी होते.

4- जैसलमेर ते जोधपुर रेल्वेमार्ग हा एक महत्त्वाचा रेल्वे मार्ग असून ओसाड जंगलातून हा मार्ग आहे. या मार्गावरून प्रवास करताना तुम्हाला असे ठिकाणी दिसतात की त्या ठिकाणी फक्त ओसाड वाळवंटी जमीन, वाळूचे ठिकाणे तसेच वाळवंटातील वन्यजीव आणि आदिवासींच्या सुंदर दृश्य अनुभवायला मिळते.

5- कालका ते शिमला रेल्वेमार्ग( हिमालयीन राणी)- हा रेल्वे मार्ग देखिल एक निसर्ग सौंदर्याने नटलेला रेल्वे मार्ग असून या मार्गावरून जर तुम्ही प्रवास कराल तर तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणावर अद्भुत अशा निसर्ग सौंदर्याचा अनुभव घेता येतो. या रेल्वे मार्गावर वीस रेल्वे स्टेशन, 80 पूल,  103 बोगदे आणि 900 वळणे पार करून हा रेल्वे मार्ग शिमला येथे पोहोचवतो. या मार्गाच्या प्रवासावर तुम्हाला खूप अविस्मरणीय असे अनुभव येतात.

Ajay Patil

Published by
Ajay Patil