भारतीय संघाचा वेस्ट इंडीजवर दणदणीत विजय

अहमदनगर Live24 टीम, , 07 फेब्रुवारी 2022 :-   अहमदाबाद येथ झालेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताने वेस्ट इंडीजला ६ गड्यांनी सहज मात दिली आहे. टीम इंडियाचा हा १०००वा वनडे सामना होता, शिवाय पूर्णवेळ कप्तान म्हणून रोहित शर्माची ही पहिलीच परीक्षा होती.

दरम्यान सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यजुर्वेंद्र चहल आणि वॉशिंग्टन सुंदर यांच्या प्रभावी फिरकीपुढे विंडीजचे फलंदाज निष्प्रभ ठरले.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

वेस्ट इंडीजचा डाव ४३.५ षटकात १७६ धावांत आटोपला. भारताकडून चहलने ४९ धावांत ४ बळी घेतले. तर सुंदरने ३ बळी घेतले. प्रसिध कृष्णाला २ बळी मिळाले.

प्रत्युत्तरात रोहितने दमदार अर्धशतकी खेळी केली. २८ षटकातच भारताने हा सामना खिशात टाकला आणि तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. यजुर्वेंद्र चहलला सामनावीर पुरस्कार मिळाला.