Infinix Smart 7 HD Smartphone Offer : अशी संधी सोडू नका! 600 रुपयांपेक्षा स्वस्तात खरेदी करा Infinix Smart 7 HD स्मार्टफोन, असा घ्या ऑफरचा लाभ

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Infinix Smart 7 HD Smartphone Offer : भारतात नुकताच Infinix Smart 7 HD स्मार्टफोन लॉन्च झाला आहे. या स्मार्टफोनची मूळ किंमत 8 हजार रुपये आहे. मात्र तुम्ही हा स्मार्टफोन फक्त 600 रुपयांपेक्षा किमतीमध्ये खरेदी करू शकता. त्यामुळे कमी किमतीमध्ये स्मार्टफोन खरेदी करण्याची चांगली संधी आहे.

तुम्हीही स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी Infinix Smart 7 HD स्मार्टफोन हा एक चांगला पर्याय असू शकतो. कारण कमी बजेट असणाऱ्या ग्राहकांना 8 हजारांचा स्मार्टफोन फक्त 600 रुपयांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करता येत आहे.

Infinix Smart 7 HD स्मार्टफोनवर ई-कॉमर्स ऑनलाईन शॉपिंग वेबसाईट फ्लिपकार्टकडून चांगली ऑफर दिली जात आहे. त्यामुळे हा स्मार्टफोन अगदी कमी रुपयांमध्ये उपलब्ध आहे. तुम्हालाही ऑफरचा लाभ घेईचा असेल तर फ्लिपकार्टवरून हा स्मार्टफोन खरेदी करावा लागेल.

Infinix Smart 7 HD ची भारतात किंमत

Infinix कंपनीकडून Infinix Smart 7 HD हा स्मार्टफोन कमी बजेट असणाऱ्या ग्राहकांसाठी सादर करण्यात आला आहे. कंपनीकडून हा स्मार्टफोन 10 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीच्या सेगमेंटमध्ये सादर करण्यात आला आहे.

हा स्मार्टफोन 2 GB रॅम आणि 64 GB स्टोरेज करण्यात आला आहे. या स्मार्टफोनची किंमत 7,999 रुपये आहे. मात्र फ्लिपकार्टकडून ऑफर देण्यात येत असल्याने स्मार्टफोनची किंमत खूपच कमी होत आहे.

फ्लिपकार्टकडून या स्मार्टफोनवर बँक ऑफर आणि एक्सचेंज डिस्काउंट देण्यात येत आहे. त्यामुळे 8 हजार रुपयांचा स्मार्टफोन अगदी 549 रुपयांना मिळत आहे. त्यामुळे ग्राहकांच्या पैशांची बचत होत आहे.

Infinix Smart 7 HD बँक ऑफर

स्मार्टफोन खरेदी करताना तुम्ही Flipkart Axis Bank कार्डांवरून पेमेंट केल्यास 5% कॅशबॅक उपलब्ध आहे. याशिवाय, फ्लिपकार्ट पे लेटरसाठी साइन अप करून आणि 500 ​​रुपयांपर्यंतचे फ्लिपकार्ट गिफ्ट कार्ड मिळवून पार्टनर ऑफरचा लाभ घेता येईल.

Infinix Smart 7 HD एक्सचेंज ऑफर

तुम्ही जर हा स्मार्टफोन फ्लिपकार्टवरून खरेदी केला तर तुम्हाला यावर 7,450 रुपयांची एक्सचेंज ऑफर देण्यात येत आहे. त्यामुळे हा स्मार्टफोन तुम्हाला 549 रुपयांना मिळत आहे. एक्सचेंज ऑफरचा लाभ घेईचा असेल तर त्यासाठी तुम्हाला तुमच्याकडील जुना स्मार्टफोन एक्सचेंज करावा लागेल. एक्सचेंज ऑफर ही तुमच्या जुन्या स्मार्टफोनच्या स्थितीवर अवलंबून असेल.