Categories: भारत

अयोध्येतील राम मंदिरात मूर्ती स्थापन करणे रावणाला खरी श्रद्धांजली ठरेल !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 24 जानेवारी 2021 :-मथुरेतील एका संघटनेने अयोध्येतील राम मंदिरात रावणाची मूर्ती बसविण्याची मागणी केली आहे. लंकेश भक्त मंडळाने पंतप्रदान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून ही मागणी केली आहे.

संघटनेचे अध्यक्ष ओमवीर सारस्वत याबाबत म्हणाले की, लंकेश भक्त मंडळ मूर्ती स्थापन करण्याचा संपूर्ण खर्च उचलेल. अयोध्येतील राम मंदिरात मूर्ती स्थापन करणे रावणाला खरी श्रद्धांजली ठरेल.

यासाठी संघटनेने पंतप्रदान मोदींसह राम जन्मभूमी ट्रस्टच्या अध्यक्षांनाही पाठविले आहे, असेही त्यांनी सांगितले. सारस्वत पुढे म्हणाले की, अयोध्या धाममध्ये प्रभू श्रीराम यांचे अद्भूत मंदिर बनविले जात आहे.

या मंदिरात प्रभू श्री रामचंद्र यांची जशी भव्य मूर्ती स्थापन केली जात आहे, तशीच भव्य मूर्ती आचार्य दशाननाचीही स्थापन केली जावी. सर्व लंकेश भक्त राम मंदिर निर्मितीसाठी स्वेच्छेने दान देण्यासह लंकेश यांच्या मूर्तीसाठीही देणगी देईल.

अयोध्येतील राम मंदिर निर्मितीच्या तयारीला वेग आलेला असताना देणग्यांचा ओघही दिवसेंदिवस वाढत चालला आहे. राम मंदिर बांधकामासाठी देणगी गोळा करण्याच्या मोहिमेला सुरुवात झाली आहे.

विश्व हिंदू परिषदेकडून देशात सध्या वर्गणी गोळा केली जात आहे. देशाच्या विविध भागातून राम मंदिर बांधण्यासाठी लोक देणगी देत आहेत.

अहमदनगर लाईव्ह 24