Govt. Scheme For Daughter : प्रत्येक पालकाला त्यांच्या पाल्यांच्या भविष्याची चिंता लागून राहिलेली असते. मुलीचे लग्न तिचे शिक्षण अशा अनेक कारणांनी पालक चिंतेत असतात. मात्र भारत सरकार मुलींसाठी वेगवेगळ्या योजना आणत आहे ज्यामधून मुलींच्या भविष्याची चिंता मिटेल.
मुलींचे भविष्य सुरक्षित करायचे असेल तर सरकारच्या सुकन्या समृद्धी योजनेत गुंतवणूक करून मुदतीच्या वेळी लाखो रुपये मिळवू शकता. सरकारकडून बेटी बचाओ, बेटी पढाओ या मोहोमेअंतर्गत २०१५ मध्ये सुकन्या समृद्धी योजना सुरु केली आहे.
मुलींच्या पालकांना गुंतवणुकीसाठी प्रोत्साहित करण्यासाठी ही योजना सुरु करण्यात आली आहे. त्यामुळे मुलींचे भविष्य सुरक्षित होत आहे. या योजनेमुळे मुलींचे शिक्षण देखील पूर्ण होत आहे.
तुम्हाला सांगतो की या योजेनचे खाते कोणत्याही भारतीय पोस्ट ऑफिसमध्ये किंवा बँकांच्या विशिष्ट शाखांमध्ये मुलीच्या नावाने 10 वर्षापूर्वी उघडले जाऊ शकते. भारतातील कोणत्याही ठिकाणी सुकन्या समृद्धी योजनेचे खाते उघडले जाऊ शकते.
योजनेचे फायदे
चालू आर्थिक वर्षासाठी, सुकन्या समृद्धी खाते 7.6% व्याजदर देते.
हे गुंतवणूक धोरण इतर बचत योजनांच्या तुलनेत सर्वाधिक व्याज देते.
एका आर्थिक वर्षात किमान 1000 रुपये आणि कमाल 1.5 लाख रुपयांची गुंतवणूक केली जाऊ शकते.
1961 च्या आयकर कायद्याच्या कलम 80C नुसार, सुकन्या समृद्धी योजना योजनेद्वारे केलेली गुंतवणूक वजावट मिळते.
वयाच्या १८ व्या वर्षी, खाते पुढील शिक्षणासाठी ५०% पैसे काढण्याची परवानगी देते.
सुकन्या समृद्धी योजनेच्या अटी व शर्ती
सुकन्या समृद्धी योजनेचे खाते काढल्यानंतर काही अति आणि शर्तींचे पालन तुम्हाला करावे लागेल. या योजनेत तुम्ही जमा केलेली रक्कम मासिक दिली जाऊ शकते.
तुमचे खाते मध्येच बंद पडल्यास आणि ते पुन्हा तुम्ही चालू केल्यास दर महिन्याला ५० रुपये दंड भरावा लागेल.
खात्यात किमान रक्कम ठेवावी लागेल अन्यथा तुमचे खाते डीफॉल्ट मानले जाईल.
खाते उघडण्याच्या तारखेपासून 15 वर्षे पूर्ण होण्याआधी, डीफॉल्ट म्हणून प्रत्येक वर्षासाठी रु. 250 आणि रु. 50 चे किमान पेमेंट करून डीफॉल्ट केलेले खाते पुन्हा चालू केले जाऊ शकते.
योजना पूर्ण झाल्यानंतर किती मिळणार पैसे
सुकन्या समृद्धी योजनेत 250 रुपयांचे खाते उघडल्यास पहिल्या महिण्यात ७५० रुपये भर. आणि त्यानंतर दार महिन्याला १००० रुपये या योजनेत जमा करा. महिन्याला १ हजार रुपये जमा केल्यानंतर वर्षाला तुमचे १२ हजार रुपये जमा होतील.
मुलीच्या जन्मावेळी खाते उघडल्यास ती २१ वर्षाची होईपर्यंत तुम्हाला व्याजासह रु. 5,27,445 ची मॅच्युरिटी रक्कम मिळेल. यामध्ये तुम्हाला भरपूर फायदा होईल.