IPL 2023 : रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) आणि लखनौ सुपर जायंट्स (LSG) यांच्यात खेळल्या गेलेल्या सामन्यांमध्ये भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार विराट कोहली आणि अफगाणिस्तान क्रिकेट संघाचा खेळाडू नवीन-उल-हक यांच्यामध्ये वाद झाला.
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) आणि लखनौ सुपर जायंट्स (LSG) यांच्यामध्ये खेळण्यात आलेल्या सामन्यादरम्यान विराट कोहली, नवीन-उल-हक आणि गौतम गंभीर यांच्यामध्ये चांगलाच वाद झाला. याची चर्चा सोशल मीडियावर सुरु आहे.
याची दखल बीसीसीआयकडून घेण्यात आली आहे. बीसीसीआयने विराट कोहली, गौतम गंभीर आणि नवीन-उल-हक यांना दंड ठोठावला आहे. त्यामुळे हे खेळाडू चांगलेच चर्चेत आले आहेत.
नवीन-उल-हक आणि विराट कोहली यांच्यात वाद झाला
सोशल मीडियावर विराट कोहली आणि नवीन-उल-हक यांच्या वादावरून अनेक मिम्स व्हायरल होत आहेत. सामन्यादरम्यान विचारात कोहली आणि नवीन-उल-हक यांच्यामध्ये वाद झाला होता. तसेच सामना पूर्ण झाल्यानंतर हस्तांदोलन करताना नवीन-उल-हकने विराट कोहलीच्या हाताला बाजूला केले त्यामुळे हे प्रकरण चांगलेच चिघळले. या दरम्यान ग्लेन मॅक्सवेलने दोघांमध्ये मध्यस्थी करत प्रकरण मिटवले.
कोण आहे नवीन-उल-हक?
नवीन-उल-हक हा अफगाणिस्तानचा उजव्या हाताचा वेगवान गोलंदाज आहे. 2016 मध्ये त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. स्पोर्ट्सकीडाच्या मते, त्याने त्याच्या 17 व्या वाढदिवसाच्या दोन दिवसांनंतर 25 सप्टेंबर 2016 रोजी बांगलादेशविरुद्ध पदार्पण केले.
नवीनने 2018 मध्ये टी-20 मध्ये पदार्पण केले. करिअर ग्राफबद्दल बोलायचे झाले तर नवीनने 34 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 48 विकेट घेतल्या आहेत. अनेक T20 लीगमध्ये त्याची कामगिरी वाखाणण्याजोगी आहे. ICC T20 विश्वचषक 2021 दरम्यान भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात सामना झाला तेव्हा नवीनने 4 षटकात 59 धावा दिल्या.
नवीन-उल-हकची आयपीएल कारकीर्द
डिसेंबर 2022 मध्ये नवीनला लखनऊ सुपर जायंट्सने 50 लाख रुपयांचा करार केला आणि संघामध्ये त्याला समाविष्ट केले. 19 एप्रिल 2023 रोजी नवीनने IPL 2023 चा पहिला सामना खेळला. नवीनने त्याच्या आयपीएल कारकिर्दीतील चौथा सामना आरसीबीसोबत खेळला.
एका मीडिया हाऊसशी संवाद साधताना नवीन म्हणाला होता की जसप्रीत बुमराह त्याचा आदर्श आहे. नवीनने असेही म्हटले होते की, जर तो बुमराहसारखा 50% बनू शकला तर तो स्वत:ला भाग्यवान समजेल.
यापूर्वीही संघर्ष झाला आहे
नवीन-उल-हक याचा विराट कोहलीसोबतच नाही तर इतर खेळाडूंसोबत देखील वाद झाला होता. पाकिस्तानचे खेळाडू शाहिद आफ्रिदी आणि मोहम्मद अमीर यांच्यात २०२० लाँग प्रीमियर लीग हंगामात जोरदार वाद झाला होता.