भारत

IRCTC Nepal Tour Package: कमी खर्चात फिरा काठमांडू, पशुपतिनाथ आणि नेपाळमधील इतर ठिकाणे! वाचा तिकीट दर आणि इतर माहिती

Published by
Ajay Patil

IRCTC Nepal Tour Package:- बऱ्याच जणांना अनेक पर्यटन स्थळांना भेट देण्याची आवड असते व असे पर्यटक नेहमीच वेगवेगळ्या  ठिकाणांना भेटी देत असतात. असे पर्यटक बऱ्याचदा कुटुंब किंवा मित्रांसोबत ट्रिप आयोजित करतात व देशातच नव्हे तर विदेशात असलेल्या महत्त्वाच्या पर्यटन स्थळांना देखील भेट देतात.

आपल्याला माहित आहे की अनेक टूर्स अँड ट्रॅव्हल्स कंपन्यांकडून देखील अशा व्यक्तींकरिता परवडणाऱ्या दरामध्ये टूर पॅकेज सादर केले जातात व अशा टूर पॅकेजचा लाभ घेऊन देखील बरेच पर्यटक हे पर्यटनाची सुवर्णसंधी साधतात.

टूर्स अँड ट्रॅव्हल्स कंपनी व्यतिरिक्त आयआरसीटीसीच्या माध्यमातून देखील देश आणि विदेशातील अनेक पर्यटन आणि अध्यात्मिक स्थळांना भेट देता येईल अशा पद्धतीने कमीत कमी दरात पर्यटनाची संधी उपलब्ध करून देण्यात येते.

अगदी याच पद्धतीने सध्या आयआरसीटीसीने आपल्या शेजारी असलेल्या नेपाळ या देशातील सुंदर आणि निसर्गाने समृद्ध असलेल्या पर्यटन स्थळांना भेट देता येईल व याकरिता एक टूर पॅकेज आयोजित केलेल्या या पॅकेजेच्या माध्यमातून नेपाळला जाण्याची सुवर्णसंधी लाभणार आहे. याच पॅकेजेची माहिती आपण या लेखात बघणार आहोत.

 नेपाळ फिरण्याची सुवर्णसंधी

 तुमचा देखील फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यामध्ये नेपाळ करण्याची संधी असेल तर भारतीय रेल्वेचा उपक्रम असलेल्या आयआरसीटीसीने नेपाळ करीता आहे. हे एक विशेष असे टूर पॅकेज आणले असून या माध्यमातून तुम्ही दिल्ली ते नेपाळ असा प्रवास करू शकणार आहात.

या पॅकेजच्या माध्यमातून तुम्हाला नेपाळमधील काठमांडू तसेच पोखरा व पशुपतीनाथ सारखे ठिकाणांना भेट देता येणार आहे. या टूर पॅकेजमध्ये तुम्ही मार्च आणि फेब्रुवारीमध्ये काठमांडू आणि पोखरा येथे भेट देऊ शकणार आहात. हे पॅकेज सहा दिवस आणि पाच रात्री साठी असून या माध्यमातून तुम्ही दिल्ली ते काठमांडू विमानाने प्रवास करू शकणार आहात.

या पॅकेजमध्ये तुम्हाला विमानाचे तिकीट मिळणार आहे. या टूर पॅकेजेचे नाव बेस्ट ऑफ नेपाळ एक्स दिल्ली असे आहे. या टूर करता तुम्ही मार्च आणि फेब्रुवारीमध्ये जाऊ शकणार आहात.

16 फेब्रुवारी 2024 आणि 28 मार्च 2024  या टूरवर निघण्याच्या तारखा असून या पॅकेज मध्ये तुम्हाला जेवण तसेच नाश्ता आणि रात्रीचे जेवण दिले जाणार असून तुमचा हा प्रवास दिल्ली ते काठमांडू विमानाने असणार आहे व विमानाचे इकॉनॉमिक क्लासचे  तिकीट तुम्हाला मिळणार आहे.

 या टूर पॅकेजसाठी येणारा खर्च किती आहे?

 या पॅकेजेसाठी जो काही खर्च येणार आहे तो पर्यटकांनी म्हणजेच प्रवाशांनी निवडलेल्या जागेवर अवलंबून असणार आहे. साधारणपणे 36 हजार पाचशे रुपये प्रति व्यक्तीपासून हा दर सुरू होईल. जर तीन जणांची बुकिंग असेल तर प्रतिव्यक्ती छत्तीस हजार पाचशे रुपये खर्च येणार आहे

तर डबल बुकिंग साठी प्रतिव्यक्ती सदतीस हजार एवढा खर्च लागेल. तसेच सिंगल बुकिंग असेल तर प्रतिव्यक्तीचा खर्च हा 45 हजार 700 रुपये असणार आहे. लहान मुलांकरिता पाच ते अकरा वर्ष वयोगटातील मुलांकरिता बेडसह वीस हजार पाचशे रुपये आणि दोन ते चार वर्षांच्या मुलांकरता बेडशिवाय 23 हजार पाचशे रुपये इतके शुल्क लागणार आहे.

Ajay Patil