भारत

Car Insurance : तुमचा कार विमा संपत आलाय? तर असा करा रिन्यू, होणार नाही कोणताही दंड…

Published by
Ahmednagarlive24 Office

Car Insurance : कोणतेही वाहन खरेदी करत असताना त्याचा पहिल्यांदा विमा काढला जातो. पण हा विमा ठराविक काळासाठी असतो. त्यानंतर पुन्हा हा विमा रिन्यू करावा लागतो. मात्र विमा संपण्याअगोदर तो पुन्हा रिन्यू केला तर कोणताही दंड लागत नाही.

कार विमा आवश्यक आहे. तो जर नसेल तर तुमच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल. तसेच कारसाठी थर्ड पार्टी इन्शुरन्स घेणे बंधनकारक आहे. कारचा विमा काढणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरते.

तुम्ही घरबसल्या ऑनलाइन विमा पॉलिसीचे नूतनीकरण करू शकता

विमा एजन्सीच्या वेबसाइटवर लॉग इन करा.
विद्यमान पॉलिसीचे नूतनीकरण करण्यासाठी पर्याय निवडा.
विद्यमान पॉलिसी क्रमांक आणि ईमेल आयडी प्रविष्ट करून ऑनलाइन फॉर्म भरा.
नवीन पॉलिसीसाठी प्रीमियम कोटेशन दिसेल.
त्यानंतर नूतनीकरणासाठी पुढे जा किंवा दुसरा चांगला पर्याय शोधा.
त्यानंतर पेमेंटचा पर्याय निवडा.
क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, नेट बँकिंग किंवा इतर ऑनलाइन वॉलेटद्वारे पेमेंट केले जाऊ शकते.
पेमेंट केल्यानंतर, सर्व पॉलिसी दस्तऐवज तुमच्या आयडीवर प्राप्त होतील.

वेळेवर कार विम्याचे नूतनीकरण करा

जर तुमच्या कारचा विमा संपत आला असेल तर तुम्ही तो लवकरच रिन्यू केला पाहिजे. जर तुम्ही विमा काढण्यास विलंब केला तर तुम्हाला वाढीव प्रीमियम भरावा लागू शकतो.

नो क्लेम बोनसचा लाभ घ्या

तुम्ही तुमच्या कारचा विमा संपण्याअगोदर काढला तर तुमच्याकडून कोणताही वाढीव प्रीमियम आकाराला जाणार नाही. पहिल्या वर्षी, नो क्लेम बोनसचा लाभ प्रीमियमवर 20% पर्यंत सूट म्हणून मिळू शकतो. म्हणजेच, जर तुमचा कार विम्याचा हप्ता 10,000 रुपये असेल, तर तुम्ही नो क्लेम बोनस म्हणून 2,000 रुपयांपर्यंत बचत करू शकता.

Ahmednagarlive24 Office