जे आहे ते आहे, मी पुढे जात राहणार…! यष्टिरक्षक संजू सॅमसनची भावनिक पोस्ट…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

India News : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन सामन्याच्या एकदिवसीय मालिकेतील दोन सामन्यासाठी भारतीय संघाची घोषणा केली. दोन सामन्यात चार वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती दिली.

त्यामुळे फलंदाज व यष्टिरक्षक संजू सॅमसनला संघात स्थान मिळण्याची शक्यता होती. परंतु, त्याला संघात स्थान देण्यात आले नाही. यानंतर सॅमसनच्या चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली तर सॅमसनने इंस्टाग्रामवर स्वतःच्या फोटोसह ‘जे आहे ते आहे !! मी पुढे जात राहणार’ असे भावनिक मत पोस्ट केले आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन सामन्याच्या एकदिवसीय मालिकेतील पहिल्या दोन सामन्यासाठी रोहित शर्मा, विराट कोहली, हार्दिक पांड्या आणि कुलदीप यादव यांना विश्रांती देण्यात आली.

दोन सामन्यासाठी भारतीय संघात ऋतूराज गायकवाड, प्रसिद्ध कृष्णा, तिलक वर्मा आणि वॉशिंग्टन सुंदर आणि अक्षर पटेल दुखापतग्रस्त असल्यामुळे अनुभवी फिरकीपट रविचंद्रन अश्विनला संघात स्थान देण्यात आले आहे.

परंतु, १ ऑगस्ट २०२३ रोजी वेस्ट इंडिजविरुद्धच्या शेवटच्या एकदिवसीय सामन्यात चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करणाऱ्या संजू सॅमसनला संधी देण्यात आली नाही. त्याने वेस्ट इंडिजविरुद्ध ४१ चेंडूत २ चौकार व ४ षटकार झळकावित ५१ धावा केल्या होत्या.

१२ एकदिवसीय सामने खेळणाऱ्या सॅमसनने तीन अर्धशतकासह ५५.७१ च्या सरासरने ३९० धावा केल्या आहेत. संजू सॅमसनला ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकदिवसीय सामन्यात संधी मिळण्याची शक्यता होती. परंतु, त्याला ती मिळाली नाही.