IMD Rain Alert : देशात अनेक राज्यामधील हवामानात बदल होत आहे. सध्या अनके राज्यामध्ये पाऊस कोसळत आहे तर काही ठिकाणी मुसळधार पावसासह गारपिटीची शक्यता भारतीय हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
तापमानात बदल होत हवामान देखील बदलत आहे. काही ठिकाणी उष्णतेत वाढ झाली आहे तर काही ठिकाणी उष्णतेत मोठी घट झाली आहे. तसेच हवामान खात्याकडून उष्णतेची लाट येणार असल्याचा अंदाज देखील वर्तवला आहे.
भारतीय हवामान खात्यानुसार, गुजरात, महाराष्ट्र, विदर्भ, छत्तीसगड, ओडिशा, झारखंड आणि पश्चिम बंगालच्या काही भागात गेल्या २४ तासांत कमाल तापमान ३५ अंश ते ३८ अंश होते.
याशिवाय राजस्थान, मध्य प्रदेश आणि बिहारच्या काही भागात तापमान 31 ते 35 अंश होते. त्याच वेळी, पंजाब, हरियाणा, चंदीगड, दिल्ली, यूपी आणि ईशान्येकडील काही भागांमध्ये कमाल तापमान 28 अंश ते 31 अंश होते.
१५ तारखेला म्हणजेच आज हवामान खात्याकडून अलर्ट जारी करण्यात आला आहे. यामध्ये विजांच्या कडकडाटासह गडगडाटी वादळ आणि ३०-४० किमी प्रतितास वेगाने सोसाट्याच्या वारा वाहणार असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे.
यामुळे पुणे, अहमदनगर जिल्ह्यांतील काही ठिकाणी तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर औरंगाबाद, जालना, बीड, हिंगोली, परभणी पुढील ३-४ तासांत मुसळधार पाऊस होईल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
तीव्र वेस्टर्न डिस्टर्बन्स १६ मार्च रोजी तयार होणार आहे. त्याचा परिणाम अनेक राज्यातील हवामानावर होणार आहे. त्यामुळे अनके भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
मुसळधार पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
रब्बी पिकांची काढणी सुरु असताना आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच फक्त पाऊसच नाही तर गारपीटही झाल्यामुळे उभी पिके जमीनदोस्त झाली आहेत.
तसेच आताही पुन्हा ३ दिवस पावसाचा इशारा देण्यात आल्याने शेतकऱ्यांना पिकांची काढणी करून घेण्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे. गहू, हरभरा आणि फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे.