Ahmednagarlive24 Marathi News
Marathi Breaking News, Marathi Live Batmya, मराठी बातम्या

Jio Air Fiber : इंटरनेटसाठी रिचार्जचे झंझट संपले! जिओच्या या नवीन उपकरणातून मिळणार 1Gbps इंटरनेट स्पीड, जाणून घ्या सविस्तर

Jio Air Fiber : देशातील सर्वात मोठ्या जिओ टेलिकॉम कंपनीकडून ग्राहकांसाठी दिवसेंदिवस नवनवीन प्लॅन सादर केले जात आहेत. त्यामुळे ग्राहकांना स्वस्तात जास्त सेवा देणारे रिचार्ज प्लॅन मिळत आहेत. तसेच जिओकडून ग्राहकांना वेगवान इंटरनेट सेवा पुरवली जात आहे.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

आता दिवसेंदिवस तंत्रज्ञानाशी निगडित अनेक नवनवीन शोध लागत असल्याने मानवी जीवन सुखकर होत आहे. इंटरनेटच्या जगात जिओकडून हायस्पीड सेवा ग्राहकांना पुरवली जात आहे. तसेच कमी दरामध्ये रिचार्ज प्लॅन उपलब्ध असल्याने ग्राहकांना देखील रिचार्ज प्लॅन परवडत आहेत.

रिलायन्स जिओकडून ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी स्वस्तातील रिचार्ज प्लॅन सादर केले जात आहेत. त्यामुळे अनेक ग्राहक जिओकडे आकर्षित होता आहेत. तसेच एका रिचार्ज प्लॅनमध्ये अनेक धमाकेदार सेवा देण्यात येत आहेत.

हायस्पीड इंटरनेट हवे असेल तर ग्राहकांना फायबर/ ब्रॉडबँड कनेक्शन बसवावे लागते. मात्र आता जिओकडून नवीन उपकरण तयार करण्यात आले आहे. याद्वारे ग्राहकांना 1gbps पर्यंत हायस्पीड इंटरनेट मिळेल.

रिलायन्स जिओ लवकरच जिओ एअर फायबर लॉन्च करणार

रिलायन्स जिओकडून लवकरच आता ग्राहकांना हायस्पीड इंटरनेट देण्यासाठी जिओ एअर फायबर लॉन्च करणार आहे. नुकतेच कंपनीकडून जिओ एअर फायबर सादर करण्यात आले आहे.

जिओ एअर फायबरला आता केबलची गरज नाही. तरीही जिओ एअर फायबर वायरलेस पद्धतीने हाय स्पीड इंटरनेट सुविधा देण्यासाठी सक्षम असेल असे कंपनीकडून सांगण्यात आले आहे.

Jio Air Fiber मध्ये 1Gbps हाय स्पीड इंटरनेट कसे मिळवायचे

जिओ एअर फायबरमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. यामध्ये कंपनीकडून 5G सिमसोबत 5G अँटेना देण्यात आला आहे. त्यामुळे आता ग्राहकांना सहज 1gbps पर्यंत हाय स्पीड इंटरनेट मिळू शकेल.

त्यामुळे आता ग्राहकांना इंटरनेटसाठी वारंवार रिचार्ज करण्याची गरज नाही. कंपनीचे म्हणणे आहे की याद्वारे तुम्ही कोणत्याही व्यत्ययाशिवाय 8K रिझोल्यूशनसह उच्च दर्जाचे व्हिडिओ कॉल आणि व्हिडिओ पाहू शकाल.