Ahmednagarlive24 Marathi News
Marathi Breaking News, Marathi Live Batmya, मराठी बातम्या

Jio Cheapest Recharge Plans : जिओने आणला सर्वात स्वस्त रिचार्ज प्लॅन! 119 रुपयांच्या रिचार्जवर मिळणार अमर्यादित कॉलिंग आणि 1.5 जीबी डेटासह अनेक फायदे

Jio Cheapest Recharge Plans : देशातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओकडून ग्राहकांना स्वस्तातील आणि परवडणारे रिचार्ज प्लॅन सादर केले आहे. त्यामुळे ग्राहकांना मोठा फायदा होत आहे. तसेच आता जिओकडून ग्राहकांसाठी सर्वात स्वस्त रिचार्ज प्लॅन सादर करण्यात आला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

जिओ ग्राहकांसाठी कंपनीकडून एक धमाकेदार रिचार्ज प्लॅन सादर करण्यात आला आहे. या रिचार्ज प्लॅनमध्ये अमर्यादित कॉलिंगसह मोफत एसएमएस आणि दररोज 1.5 जीबी इंटरनेट दिले जात आहे. तसेच यासह अनेक फायदे देखील दिले जात आहेत.

Jio 119 रुपयांच्या प्लॅनमध्ये अनेक फायदे

जिओकडून ग्राहकांसाठी 119 रुपयांचा प्लॅन आणला आहे. ज्यामध्ये अनेक फायदे दिले जात आहेत. जिओच्या 119 रुपयांच्या रिचार्ज प्लॅनमध्ये प्रतिदिन 1.5 GB डेटा दिला जात आहे. तसेच या रिचार्ज प्लॅनमध्ये 300 मोफत एसएमएस आणि अमर्यादित कॉलिंगचा लाभ दिला जात आहे.

119 रुपयांच्या या रिचार्ज प्लॅनमध्ये Jio TV, Jio Cinema Jio Security, Jio Cloud सारख्या अॅप्सचे फ्री सब्सक्रिप्शन देखील मिळत असल्याने हा रिचार्ज प्लॅन ग्राहकांसाठी खूपच फायदेशीर ठरत आहे. जिओकडून हा रिचार्ज प्लॅन फक्त 14 दिवसांच्या वैधतेसाठी दिला जात आहे.

1.5 जीबी डेटासह हे आहेत जिओचे उत्तम प्लॅन

Jio कडून ग्राहकांसाठी प्रतिदिन 1.5 जीबी डेटासह अनेक रिचार्ज प्लॅन दिले जात आहेत. यामध्ये 199, 239, 259, 479, 666 आणि 2545 रुपयांच्या प्लॅनचा समावेश आहे.

Jio च्या 199 रुपयांच्या प्लॅनची ​​वैधता 23 दिवस आहे. तसेच 28 दिवसांच्या वैधतेसह Jio चा 239 रुपयांचा प्लॅन येत आहे, एक महिन्याच्या वैधतेसह Jio चा 259 ​​रुपयांचा प्लॅन आहे, सुमारे दोन महिने म्हणजे 56 दिवसांच्या वैधतेसह Jio चा 666 रुपयांचा प्लॅन येत आहे. Jio चा 2545 रुपयांचा प्लॅन एकूण 336 दिवसांच्या वैधतेसह येतो.

जिओने ग्राहकांसाठी आणलेल्या सर्वात स्वस्त रिचार्ज प्लॅनमध्ये देखील दररोज 1.5 GB डेटा देण्यात येत आहे. जर तुम्ही जिओ ग्राहक असाल तर तुम्ही तुमच्या गरजेनुसार रिचार्ज प्लॅन निवडू शकता.