भारत

Jio Recharge Plan : दरमहा रिचार्ज करण्याचे झंझट संपले! जिओने सुरु केला 388 दिवसांचा सर्वात स्वस्त रिचार्ज प्लॅन, जाणून घ्या सविस्तर

Jio Recharge Plan : देशातील टेलिकॉम कंपन्यांकडून ग्राहकांकसाठी दिवसेंदिवस नवनवीन प्लॅन सादर केले जात आहेत. या नवीन रिचार्ज प्लॅनमध्ये ग्राहकांना स्वस्तातील रिचार्ज प्लॅन कंपनीकडून सादर केले जात आहेत. त्यामुळे ग्राहकांना मोठा फायदा होत आहे.

ग्राहकांना सतत दरमहा रिचार्ज करावा लागत असल्याने आता जिओ टेलिकॉम कंपनीकडून सर्वात स्वस्त ३८८ दिवसांचा रिचार्ज प्लॅन आणला आहे. त्यामुळे आता जिओ ग्राहकांना दरमहा रिचार्ज करण्याचे टेन्शन संपणार आहे.

जिओ टेलिकॉम कंपनीकडून आता जिओ ग्राहकांसाठी ३८८ दिवसाचा रिचार्ज प्लॅन अगदी कमी किमतीत आणला आहे. त्यामुळे ग्राहकांना मोठा फायदा होणार असून ग्राहकांचे पैसे देखील वाचणार आहेत.

जर जिओ ग्राहकांनी हा नवीन ३८८ दिवसांचा रिचार्ज केला तर त्यांना दररोज ८ रुपयांपेक्षाही कमी खर्च येणार आहे. त्यामुळे ग्राहकांना मोठा फायदा होणार आहे. तसेच या प्लॅनमध्ये अनेक ऑफर देखील दिल्या जात आहेत.

जिओ कंपनीकडून ग्राहकांना ३८८ दिवसांच्या रिचार्ज प्लॅनमध्ये 75GB अतिरिक्त इंटरनेट डेटा मोफत दिला जात आहे. तसेच इतर ऑफर देखील दिल्या जात असल्याने ग्राहकांच्या खिशाला परवडणारा हा प्लॅन आहे.

Reliance Jio 388 दिवसांची वैधता रिचार्ज प्लॅन

जिओ कंपनीकडून सादर करण्यात आलेल्या 388 दिवस वैधता रिचार्ज प्लॅनची ​​किंमत 2,999 रुपय आहे. या रिचार्ज प्लॅनमध्ये ग्राहकांना अमर्यादित कॉलिंगसह दररोज 2.5GB इंटरनेटचा लाभ देण्यात येत आहे.

तसेच या रिचार्ज प्लॅनमध्ये ग्राहकांना JioTV, JioCinema, JioSecurity आणि JioCloud मोबाइल अॅप्लिकेशन्सची मोफत सदस्यता कंपनीकडून देण्यात येत आहे. त्यामुळे ग्राहकांना यासाठी अतिरिक्त पैसे मोजावे लागणार नाहीत.

अमर्यादित 5G इंटरनेट उपलब्ध

जिओ कंपनीकडून देशातील अनेक शहरांमध्ये 5G सेवा सुरु केली आहे. जर तुमच्याही शहरात 5G सेवा सुरु झाली असेल आणि तुमचा स्मार्टफोन 5G असेल तर तुम्ही अमर्यादित 5G इंटरनेटचा लाभ सध्याच्या रिचार्ज प्लॅनवर घेऊ शकता. कंपनीकडून अनेक शहरांमध्ये हाय स्पीड 5G इंटरनेट टेस्ट सुरु आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts