Jio World Plaza Mall : रिलायन्स इंडस्ट्रीजने टेलिकॉम क्षेत्रात स्वत:चे वेगळे स्थान निर्माण केले आहे. कंपनी इतर क्षेत्रातही प्रवेश करण्याच्या तयारीत आहे, तर कंपनीने यापूर्वीच काही क्षेत्रात प्रवेश देखील केला आहे. ऑनलाइन क्षेत्रात कंपनीने आपले मोठे नाव कमवले आहे.
कंपनी आता देशातील पहिला लक्झरी मॉल लाँच करण्याच्या तयारीत आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज 1 नोव्हेंबर 2023 रोजी भारतातील पहिला मोठा लक्झरी मॉल लाँच करणार आहे. या मॉलमध्ये तुम्हाला इंटरनॅशनल ब्रँडसह अनेक वेगवेगळे ब्रँड पाहायला मिळतील. त्याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊयात –
भारतातील पहिला मोठा लक्झरी मॉल
रिलायन्स इंडस्ट्रीज देशातील सर्वात मोठा लक्झरी मॉल लाँच करण्याच्या तयारीत आहे. याचे नाव जिओ वर्ल्ड प्लाझा मॉल (Jio World Plaza Mall) असेल. जिओ वर्ल्ड प्लाझा मॉलचे उद्घाटन १ नोव्हेंबररोजी मुंबईत होणार आहे. जिओ वर्ल्ड प्लाझा मॉल मुंबईतील वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स येथे उघडण्यात येणार आहे.
लग्जरी शॉपिंगचा अनुभव
हा मॉल जितका आलिशान असेल, तितकाच शॉपिंगच्या बाबतीत तुम्हाला आलिशान अनुभव देईल. जिओ वर्ल्ड प्लाझा मॉलमध्ये असे अनेक ब्रँड असतील ज्यांच्याबद्दल तुम्ही एकतर ऑनलाइन ऐकले असेल किंवा ज्यांची नावे भारताव्यतिरिक्त इतर देशांमध्ये लोकप्रिय असतील.
मॉलमध्ये अनेक ब्रॅण्ड्स उपलब्ध असतील
या मॉलमध्ये तुम्हाला अशा ब्रँड्सची स्टोअर्स मिळतील, जी फक्त ऑनलाइन किंवा देशाबाहेर उपलब्ध आहेत. फॅशन जसे की, हाऊस लुई व्हिटन, Gucci, Dior, मनीष मल्होत्रा, पॉटरी बार्न, जगप्रसिद्ध ज्वेलर्स कार्टियर आणि Bulgari सारखे ब्रँडही यात असतील.
Bulgari ब्रँड पहिल्यांदाच भारतीय बाजारात येत आहे. मॉलच्या इतर सेवांबद्दल बोलायचे झाले तर वैयक्तिक दुकानदार, व्हीआयपी गेटकीपर, मॅरेज गेटकीपर आणि कुली देखील येथे उपलब्ध असतील.
सध्या मोजकीच आहेत लग्जरी शॉपिंग प्लेस
सध्या देशात मोजकीच लक्झरी शॉपिंग प्लेसेस आहेत. यामध्ये यूबी सिटी, डीएलएफ एम्पोरियो, फिनिक्स पॅलेडियम आणि द चाणक्य यांचा समावेश आहे. पूर्वी केवळ काही पंचतारांकित हॉटेल्समध्ये लक्झरी ब्रँडसाठी मर्यादित पर्याय होते. रिलायन्स इंडस्ट्रीजच्या जिओ वर्ल्ड प्लाझा मॉलमधून आता तुम्हाला भारतातील ब्रँडसह विदेशातील ब्रँड्स सह या लक्झरी मॉल्समध्ये नवा अनुभव मिळणार आहे.