Job Interview Tips : तुम्हीही नवीन नोकरीच्या शोधात असाल आणि मुलाखतीची तयारी करताय? तर तुमच्यासाठी काही टिप्स फायदेशीर ठरू शकतात. कारण मुलाखत देताना तुम्हाला अनेक गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे. जर तुम्ही काही टिप्स फॉलो केल्या तर नक्कीच तुम्ही मुलाखतीमध्ये पास व्हाल.
मुलखात देत असताना समोरील व्यक्ती तुमच्यापेक्षा मोठा असू शकतो. त्यामुळे समोरील व्यक्तीचा मान ठेऊन तुम्ही मुलाखत देण्याचा प्रयत्न करा. तसेच हावभाव आणि भाषेचा वापर व्यवस्थित करणे गरजेचे आहे.
मुलाखत देताना खालील टिप्स फॉलो करा
1. एक आकर्षक बायोडाटा तयार करा
मुलाखत देण्यासाठी जात असाल तर तुमच्याकडे बायोडाटा असणे गरजेचे आहे. हाच बायोडाटा तयार करताना तुम्हाला अनेक गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे. बायोडाटा हा आकर्षक असावा त्यामध्ये चुका नसाव्यात.
2. कंपनीबाबत माहिती घ्या
तुम्ही ज्या कंपनीमध्ये मुलखात देण्यासाठी जात आहात त्या कंपनीबद्दल आगोदर माहिती जाणून घ्या. जर तुम्ही कंपनीबद्दल काहीही माहिती करून घेतले नाही तर मुलखात घेणाऱ्या व्यक्तीला वाटेल की तुम्हाला या कंपनीमध्ये काहीही स्वारस्य नाही. त्यामुळे कंपनीबद्दल सर्व माहिती असणे आवश्यक आहे.
3. मॉक मुलाखत
अनेकदा मुलाखत देण्यासाठी गेल्यानंतर तुमच्याकडून मॉक टेस्ट देखील घेतली जाते. त्यामुळे तुमची मॉक टेस्ट देण्याची देखील तयारी असावी. तसेच तुम्हाला विचारलेल्या सर्व प्रश्नाची उत्तरे माहिती असणे आवश्यक आहे. विचारलेल्या प्रश्नांची सहज उत्तरे देण्याचा सराव करा, व्हिडिओ रेकॉर्ड करून स्वत:ला पहा आणि तुमच्यात कुठेही कमतरता आहे ते सुधारण्याचा प्रयत्न करा.
4. आत्मविश्वास
मुलखात देण्यासाठी जात असताना आत्मविश्वास असणे गरजेचे आहे. जर तुमच्याकडे आत्मविश्वास असेल तर तुम्ही सहजपणे मुलाखत देऊ शकता. तसेच आत्मविश्वासामुळे तुम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे सहज देऊ शकता.
5. सत्यता
तुम्ही मुलाखत देण्यासाठी ज्या ठिकाणी जात आहात त्या ठिकाणच्या मुलाखतकाराने अनेक जणांच्या मुलाखती घेतलेल्या असतील. त्यामुळे त्यांना अनेक गोष्टींबद्दल माहिती असते. त्यामुळे तुम्ही मुलखात देताना प्रामाणिक राहा. तसेच गैरवर्तन करणे टाळा.
6. कपड्यांचा रंग
तुम्ही मुलाखतीसाठी जात असताना तुमची कपडे देखील खूप महत्वाची असतात. तुमच्या कपड्यांच्या रंगाचा देखील मुलाखतकारावर प्रभाव पडत असतो. सर्वेक्षणात मुलाखतीसाठी निळा, काळा आणि पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान करणे योग्य मानले गेले आहे.