अहमदनगर Live24 टीम, 30 सप्टेंबर 2021 :- देशभरात कोरोना व्हायरसच्या सक्रिय रुग्णांच्या संख्येत घट होत आहे, त्यासोबतच बरे होण्याचे प्रमाणही सतत वाढत आहे. देशातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98 टक्क्यांवर पोहोचले आहे.
याशिवाय, देशात साप्ताहिक पॉझिटिव्हिटी रेट 5-10 टक्के आहे. याबाबतची माहिती केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी दिली आहे.
दरम्यान देशातील कोरोना व्हायरसच्या परिस्थितीबद्दल माहिती देताना केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण म्हणाले की, देशात कोरोना व्हायरसची प्रकरणे कमी होत आहेत
परंतु केरळमध्ये अजूनही जास्तीत जास्त प्रकरणे नोंदवली जात आहेत. यामुळे सतर्कता बाळगणं गरजेचे आहे. याचबरोबर, सणासुदीचा हंगाम येत आहे.
आम्ही सर्वांना गर्दीपासून दूर राहण्याचे, सोशल डिस्टंसिंग पाळण्याचे आणि मास्क वापरण्याचे आवाहन करतो, असे राजेश भूषण म्हणाले.
तसेच, कोविडच्या अनुकूल व्यवहाराचे पालन करून लोकांनी सण साजरा करावा, असे निर्देश सुद्धा यावेळी राजेश भूषण यांनी दिले आहेत.