Jyotish Tips : मनुष्याच्या जीवनात अनेक समस्या असतात. त्यामुळे या समस्या दूर करण्यासाठी दररोज ज्योतिषी वेगवेगळे उपाय सुचवत असतात. तसेच ज्योतिषशास्त्रानुसार अनेकजण हे उपाय करत असतात. जर तुम्हालाही तुमची आर्थिक परिस्थिती सुधारायची असेल तर तुम्ही देखील सूर्याचे काही उपाय करून रातोरात मालामाल बनू शकता.
ज्योतिषशास्त्रानुसार ९ ग्रहांपैकी सूर्य हा पहिला आणि सर्वोच्च ग्रह मानला जातो. जर तुम्ही रविवारच्या दिवशी सूर्याची पूजा केली तर तुम्हाला शुभ लाभ होतात. जर तुमचीही आर्थिक स्थिती चांगली नसेल तर खालील उपाय करून तुम्ही धनलाभ मिळवू शकता.
सूर्यासाठी रविवारी करा हे उपाय
दररोज सकाळी लवकर उठून स्नान करणे गरजेचे आहे. तसेच सूर्योदयाच्या वेळी स्नान कारण करून सूर्याला जल अर्पण करणे शुभ मानले जाते. असे केल्याने तुमच्यावरील संकट टळते. जर तुम्ही हा उपाय दररोज केला तर तुमची दुःखापासून कायमची मुक्तता होईल.
जर तुमच्या कुंडलीमध्ये सूर्य कमजोर असेल तर तुमच्यासाठी देखील एक उपाय आहे. दररोज तुम्ही पिठाचे गोळे करून माशांना खाऊ घाला. असे केल्याने तुमच्या कुंडलीतील सूर्य मजबूत बनेल. हा उपाय करण्यासाठी रविवार हा शुभ दिवस मानला जातो. हा यपाय केल्याने तुमच्या जीवनातील दुःख दूर होतील
व्यवसाय आणि नोकरीत प्रगतीसाठी रविवारी वाहणाऱ्या पाण्यात तांदूळ आणि गूळ मिसळलेले पाणी नदीत टाकावे. हा उपाय केल्याने माणसाच्या सर्व आर्थिक समस्या दूर होतात. तसेच आर्थिक वृद्धी देखील चांगली होईल.
वेळेअभावी रविवारचे उपाय अनेकांना करता येत नाहीत. त्यांच्यासाठी रविवारी कोणतीही उपाययोजना करण्याऐवजी किमान एक लाल रंगाचे वस्त्र परिधान करणे चांगले. हे शक्य नसेल तर खिशात लाल रंगाचा रुमाल ठेवा. यातून सूर्याची अनुकूलताही प्राप्त होते. घराबाहेर पडल्यावर कपाळावर रक्तचंदनाचा टिळक लावा.
रविवारी तुम्ही शिवमंदिरात जाऊन शिवलिंगाला पाण्याने अभिषेक करू शकता. तसेच महादेवाला फुले अर्पण करा. तुमच्या दारात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला काहीतरी खायला द्या. असे केल्याने तुमच्या जीवनात नक्कीच चांगले दिवस येतील.