Ahmednagarlive24 Marathi News
Marathi Breaking News, Marathi Live Batmya, मराठी बातम्या

Jyotish Tips : अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर करा हे तुळशीचे उपाय, माता लक्ष्मी होईल प्रसन्न, घरात येईल पैसा

अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्ही तुळशीचे काही उपाय केल्यास आर्थिक धनलाभ होईल असे ज्योतिषशास्त्रात सांगण्यात आले आहे. त्यामुळे तुम्ही देखील काही उपाय करून घरातील आर्थिक परिस्थिती सुधारू शकता.

Jyotish Tips : देशात अक्षय तृतीय या सणाला अधिक महत्व आहे. यावर्षी २०२३ मध्ये एप्रिल महिन्यात २२ तारखेला अक्षय तृतीया आली आहे. अक्षय तृतीयेचा मुहूर्त शुभ मानला जातो. त्यामुळे अनेकजण या दिवशी अनेक शुभ कार्य करत असतात.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

ज्योतिषशास्त्रानुसार अक्षय तृतीये दिवशी तुळशीचे काही उपाय केल्यास तुमच्या घरात आर्थिक लाभ होईल. तसेच घरात सुख शांती देखील लाभेल. त्यामुळे अनेकदा या दिवशी दानधर्म करण्यास सांगितले जाते. हिंदू धर्मीय लोक या दिवशी दानधर्म करून शुभ कार्य करत असतात.

तुळशीचे हे उपाय प्रत्येक समस्या दूर करतील

जर तुम्हाला आर्थिक लाभ किंवा घरातील अर्थी परिस्थिती सुरळीत व्हावी वाटत असेल तर तुम्ही नक्कीच ज्योतिषशास्त्रात सांगण्यात आलेले उपाय करा. त्यामुळे तुमच्या जीवनात आर्थिक समस्या उद्भवणार नाही.

जर तुम्ही अक्षय तृतीयेदिवशी घरात तुळशीचे रोपटे लावले आणि नियमितपणे दररोज त्या रोपट्याला पाणी घातले तर नक्कीच तुम्हाला आर्थिक लाभ होईल. जसे हे रोपटे बहरेल तसेच तुमचे नशीबही चमकू लागेल.

तसेच दुसरा उपाय म्हणजे भगवान विष्णूंच्या मंदिरात जाऊन तुम्ही तुळशीचे रोप लावा. तसेच तुम्ही या ठिकाणी पिवळ्या झेंडूची रोपे देखील लावू शकता. मंदिरातील पुजाऱ्यांना प्रसाद देताना तुळशीच्या पानांचा समावेश करण्यास सांगा.

जर तुम्ही असे केल्यास तुमच्या सर्व समस्या दूर होतील. तसेच माता लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होऊन तुम्हाला चांगला आर्थिक लाभ होईल. तुमच्या घरातील सर्वांना चांगला आर्थिक लाभ होईल असे देखील ज्योतिषशास्त्रात सांगण्यात आले आहे.

यंदाच्या वर्षी अक्षय तृतीयेच्या दिवशी शनिवार येत असल्याने तुम्ही हनुमानजींची देखील पूजा करू शकता. या दिवशी १०८ तुळशीचा पानांचा हार करून हनुमानजींना घाला त्यामुळे तुमची आर्थिक वृद्धी होईल.

तुम्ही या दिवशी हनुमानजींना तुळशीच्या पानांचा हार घातला तर नक्कीच तुम्हाला आर्थिक लाभ होईल. तसेच तुमच्यावरील सर्व संकटे देखील दूर होतील. शनिवारी अक्षय तृतीय आल्याने त्याचे महत्व अधिक वाढले आहे.