यापुढे कंगनाचा चित्रपट शहरात प्रदर्शित होऊ देणार नाही !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,20 सप्टेंबर 2020 :-शिवसेना पक्षप्रमुख व महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नावाचा एकेरी उल्लेख केल्याबद्दल चित्रपट अभिनेत्री कंगना रनौत हिचा एकही चित्रपट यापुढे कोपरगाव शहरात प्रदर्शित होऊ दिले जाणार नाही,

अशी भूमिका कोपरगाव शिवसेनेने घेतली. यावेळी जिल्हाप्रमुख राजेंद्र झावरे म्हणाले, देशद्रोही कंगना रनौत मुंबईमध्ये येऊन सुपरस्टार बनली.

स्वत:च स्वप्न साकार केलं आणि आता तिनेच आपल्या मुंबईची तुलना पाकव्याप्त कश्मीर बरोबर केली. शिवसैनिकांचे दैवत पक्षप्रमुख व राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एकेरी भाषेत बोलली.

ह्याच विकृत, उन्मत्त बाईने महाराष्ट्र सरकारला बाबरच्या नावाने संबोधित करून आपल्या महाराष्ट्राचा व मुंबई पोलिसांचा अवमान करण्याचे धाडस केले.

झाशीच्या राणीची भूमिका केल्यामुळे ती स्वत:ला झाशीची राणी समजायला लागली. कुठे ती थोर वीरांगना झाशीची राणी आणि कुठे ही वाटांगण कंगणा. स्त्री असो किंवा पुरुष महाराष्ट्राचा अवमान करणाऱ्याला शिक्षा ही झालीच पाहिजे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24