Ahmednagarlive24 Marathi News
Marathi Breaking News, Marathi Live Batmya, मराठी बातम्या

Kidney Stone : किडनी स्टोनची लक्षणे दिसताच करा हे घरगुती उपाय, मिळेल आराम; जाणून घ्या लक्षणे

जर तुम्हालाही किडनी स्टोनचा त्रास होत असेल किंवा पोटदुखीचा त्रास असेल तर तुम्ही घरगुती उपाय करून त्यावर सुटका मिळवू शकता. तसेच किडनी स्टोनची काही तुम्ही देखील ओळखू शकता.

Kidney Stone : चुकीच्या सवयी आणि चुकीचा आहार यामुळे अनेकांचे आरोग्य बिघडले आहे. धावपळीच्या जीवनात अनेकजण शरीराकडे लक्ष देत नाहीत. त्यामुळे तरुण वयातच अनेकांना गंभीर आजारांनी वेढले आहे. सध्या देशात किडनी स्टोनचे प्रकार वाढू लागले आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

अनेकांना पोटदुखीची समस्या निर्माण होऊ लागली आहे. याची जवळपास लक्षणे असतात ती म्हणजे किडनी स्टोन पित्ताशय स्टोन. या दोन आजारांमुळेच अनेकांच्या पोटात दुखत असते. त्यामुळे अनेकांना त्रास सहन करावा लागतो.

जास्तीचे क्षार असलेले पाणी पिणे आणि जास्त पाणी न पिणे हे दोन कारणे किडनी स्टोनला कारणीभूत ठरत आहेत. त्यामुळे दिवसातून जास्तीत जास्त स्वच्छ पाणी पिणे हा त्यावरील चांगला उपाय आहे.

किडनी स्टोनची लक्षणे

आजकाल अनेक तरुण आणि वृद्ध व्यक्तींना किडनी स्टोनचा त्रास होत आहे. किडनीमध्ये कॅल्शियम जमा झाल्यामुळे स्टोनची समस्या निर्माण होत असते. किडनीमध्ये कॅल्शियम जमा झाल्याने पोटात तीव्र वेदना होत असतात.

अनेकांना पोटदुखीसोबतच, पाठदुखी, पाठदुखी, उलट्या, मळमळ, ताप, लघवीतून रक्त येणे, किडनी निकामी होणे असे त्रास होतात. त्यामुळे पोटदुखीकडे दुर्लक्ष करणे अनेकदा महागात पडू शकते.

अशा प्रकारे करा किडनी स्टोनवर घरगुती उपचार

जर तुम्हालाही किडनीस्टोनमुळे पोटदुखीचा त्रास होत असेल तर तुम्ही सर्वात प्रथम दवाखान्यात जाऊन डॉक्टरांचा सल्ला घ्या. जर तुमचा स्टोन ५ mm पेक्षा लहान असेल तर तुम्ही घरगुती उपाय करून त्रासमुक्त होऊ शकता.

जर तुम्ही घरगुती उपाय करत असाल तर तुम्हाला काही दिनचर्या आणि पथ्य पाळण्याची गरज आहे. दररोज तुम्हाला काही गोष्टींचे पालन करणे बंधनकारक असेल. जर 5 मिमी पेक्षा स्टोन मोठा असेल तुम्हाला ऑपरेशन हा एकमेव पर्याय आहे.

1. आहारात पौष्टिक पदार्थांचा समावेश करा.

2. हिरव्या पालेभाज्या खाव्यात.

3. दिवसभरात किमान 4 लिटर पाणी प्या.

4. भरपूर व्यायाम करा, त्यामुळे वजन वाढण्याच्या समस्येपासून सुटका मिळेल.

5. लक्षणे दिसू लागल्यास ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधा.