Ahmednagarlive24 Marathi News
Marathi Breaking News, Marathi Live Batmya, मराठी बातम्या

Kisan Credit Card : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! आता मोदी सरकारकडून मिळणार 3 लाख रुपये, नवीन आदेश जारी

Kisan Credit Card : भारताला संपूर्ण जगात कृषिप्रधान देश म्हणून ओळखले जाते. देशातील निम्म्याहून अधिक लोकसंख्या ही शेतीवर अवलंबून आहे. त्यामुळे केंद्र सरकारकडून देशातील शेती क्षेत्राला चालना देण्यासाठी अनके योजना राबवल्या जात आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

मोदी सरकारकडून देशातील अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेमधून एका वर्षांमध्ये शेतकऱ्यांना ६ हजार रुपये दिले जातात. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळत आहे.

आता शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण आता केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांसाठी नवीन योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेमधून शेतकऱ्यांना ३ लाख रुपये दिले जात आहेत. याबाबत सरकारकडून आदेश देखील जारी करण्यात आला आहे.

शेती क्षेत्राला चालना देण्यासाठी आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी केंद्र सरकारकडून ही योजना सुरु करण्यात आली आहे. त्यामुळे शेतकरी या योजनेचा फायदा घेऊन शेतीतून चांगले उत्पन्न घेऊ शकतात.

शेतकऱ्यांना आर्थिक मदत म्हणून केंद्र सरकारकडून अनेक योजनेद्वारे आर्थिक मदत दिली जात आहे. आता शेतकऱ्यांना थेट केंद्र सरकारकडून ३ लाख रुपये दिले जात आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचा मोठा फायदा होणार आहे.

या योजनेचा शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे

केंद्र सरकारकडून पीएम किसान व्यतिरिक्त देशात अनेक योजना शेतकऱ्यांसाठी राबवल्या आहेत. त्यामध्ये किसान क्रेडिट कार्डचा देखील समावेश आहे. या योजनेमधूनच शेतकऱ्यांना ३ लाख रुपये दिले जात आहेत.

ज्या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेसातून आर्थिक मदत मिळत आहे अशा शेतकऱ्यांना केंद्र सरकारकडून किसान क्रेडिट कार्डचा लाभ दिला जावा असे आदेश केंद्रीय अर्थमंत्र्यांनी दिले आहेत.

शेतकऱ्यांना मिळणार ३ लाख रुपयांची आर्थिक मदत

केंद्र सरकारकडून देशातील शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्डद्वारे कमी व्याजदरात आर्थिक मदत दिली जात आहे. किसान क्रेडिट कार्डद्वारे शेतकऱ्यांना ३ लाख रुपयांचे कर्ज दिले जात आहे. हे कर्ज कमी व्याजदरात उपलब्ध असल्याने शेतकऱ्यांना चांगला फायदा होत आहे.

किसान क्रेडिट कार्डवर कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना सबसिडी देखील जाहीर केली जाते. त्यामुळे गरजू शेतकऱ्यांना या योजनेचा चांगला फायदा होत आहे. या योजेनमुळे शेतकऱ्यांना शेतीसाठी आर्थिक हातभार लागत आहे तसेच सावकाराच्या तावडीतून शेतकऱ्यांची सुटका देखील होत आहे.

अशा टक्केवारीच्या दराने कर्ज उपलब्ध आहे

किसान क्रेडिट कार्डद्वारे शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या ३ लाख रुपयांच्या कर्जावर शेतकऱ्यांकडून ७ टक्के दराने व्याजदर आकारले जात आहे. जर शेतकऱ्यांनी या कर्जाची रक्कम वेळेवर पार्ट केली तर त्यांना या व्याजावर ३ टक्के सूट देखील दिली जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना केवळ फक्त ४ टक्के व्याजदराने हे पैसे मिळत आहेत.

असा करा अर्ज

जर तुम्हाला या योजेनचा लाभ घेईचा असेल तर तुम्ही अधिकृत पोर्टलला भेट देऊन अर्ज करू शकता. तसेच तुमच्या जवळच्या बँक शाखेत जाऊन तुम्ही किसान क्रेडिट कार्डसाठी अर्ज करू शकता.

पीएम किसानच्या वेबसाइटवर किसान क्रेडिट कार्डचा फॉर्म देखील देण्यात आला आहे. तुम्हाला किसान क्रेडिट कार्ड घ्यायचे असेल तर फॉर्म भरा आणि कोणत्याही बँकेत सबमिट करा आणि तुम्हाला योजनेचा लाभ मिळेल.