कोहलीची कार पडलीय पोलीस स्टेशनमध्ये धूळ खात ,कारण ऐकून तुम्हीही आश्चर्यचकित व्हाल .

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 14 डिसेंबर 2020 :-  भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीकडे महागड्या गाड्यांचा ताफा आहे हे तर तुम्ही ऐकलं असेलच .पण त्याच्याकडे असणारी ऑडी कार पोलीस स्टेशनमध्ये धूळ खात पडलीय .

विश्वास बसत नाही म्हणताय तर वाचा .घडलय असं काही कि ज्यामुळे कोहलीच्या कारची वाईट दुर्दशा झालीय . सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या छायाचित्रामुळे हा सगळा प्रकार उघडकीस आलाय .कोहलीने ती कार एका एजंटमार्फत विकली .पण ज्या व्यक्तीने ती कार विकत घेतली तो व्यक्ती घोटाळ्यात आरोपी म्हणून सापडली .

त्यामुळे ती कार पोलीसांमार्फत जप्त करण्यात आली कोहलीच्या कारच छायाचित्र पाहिल्यानंतर आपल्याला तिची दुर्दशा कळून येते . कारचा एका बाजूचा दरवाजा तुटलेला असून आतमधील सामानही खराब अवस्थेत दिसून येते . त्या गाडीच मॉडेल ऑडी आर ८,२०१२ आहे . २०१६ साली एका एजंटमार्फत हि कार विकण्यात आली .

कार विकत घेणाऱ्या व्यक्तीचे नाव समीर ठक्कर आहे .सन २०१६ साली समीर ठक्कर यानी ती कार विकत घेतली .पण त्यानंतर त्याच्यावर कॉल सेंटर घोटाळा निश्चित झाला. त्यामुळे पोलीस कारवाईत सदर कार पोलिसांनी जप्त केली . घोटाळ्यात नाव उघडकीस येण्याच्या आधी समीर ठक्कर याने मैत्रिणीला कार गिफ्ट देण्यासाठी विकत घेतली .

त्यासाठी त्याने जवळपास अडीच कोटी रुपये मोजले . कॉल सेंटर घोटाळ्यात त्याच नाव आल्यानंतर तो गायब झाला . त्यानंतर पोलिसांनी त्याच्या मालमत्तेवर जप्ती आणली ज्यात हि कारही जप्त करण्यात आली .बाकीच्या गाड्यांप्रमाणे या गाडीलाही पोलिसांनी पोलीस ठाण्यात ठेवलय .

विराट कोहलीने कागदोपत्री गाडी समीर ठक्करच्या नावावर केल्यामुळे त्याचा या गाडीशी काहीही संबंध नसल्याचं सांगण्यात येत

अहमदनगर लाईव्ह 24