अहमदनगर Live24 टीम, 22 जानेवारी 2021 :-राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालूप्रसाद यादव यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. रांचीच्या हॉस्पिटलमध्ये त्यांना दाखल करण्यात आलं. अचानक त्रास होऊ लागल्यामुळे त्यांच्यावर तातडीनं उपचार सुरू करण्यात आले.
बहुचर्चित चारा घोटाळाप्रकऱणी शिक्षा भोगत असलेले बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्यामुळे त्यांना रांचीच्या रिम्स हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलंय.
त्यांना फुफ्फुसाशी संबंधित आजार असून तो अचानक बळावल्यामुळे श्वास घ्यायला त्रास होऊ लागला. दिल्लीतील एम्स रुग्णालयातील डॉक्टरांशी रांचीच्या रुग्णालयातील डॉक्टर संपर्कात असून परस्पर चर्चेतून लालू प्रसाद यादव यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले.
सध्या लालूप्रसाद यादव यांची प्रकृती स्थिर असून ती धोक्याच्या बाहेर असल्याची माहिती मिळतेय. लालूप्रसाद यादव आता त्यांच्या खोलीत चालू फिरू लागले आहेत
आणि नेहमीचा आहारदेखील घेत असल्याची माहिती रुग्णालयातील सूत्रांनी दिलीय. लालू प्रसाद यादव यांची रक्तचाचणी, ईसीजी आणि तर काही चाचण्या करण्यात आल्या आहेत.