अहमदनगर Live24 टीम, 13 डिसेंबर 2020 :- चारा घोटाळ्याप्रकरणी दोषी ठरलेले लालूप्रसाद यादव हे शिक्षा भोगत आहे. दरम्यान त्यांच्या प्रकृतीबाबत अत्यंत महत्वाची माहिती समोर येत आहे.
चारा घोटाळ्याप्रकरणी दोषी ठरलेले लालूप्रसाद यादव सध्या रांची येथील राजेंद्र इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स येथे दाखल आहे. आता त्यांचा उपचार करत असलेले डॉक्टर उमेश प्रसाद यांनी मोठी आणि महत्वाची माहिती दिली आहे.
लालू यांचे मूत्रपिंड फक्त 25 टक्केच कार्यरत आहे, अशी माहिती उमेश प्रसाद यांनी शनिवारी दिली. ही परिस्थिती चिंताजनक आहे कारण अशावेळी त्यांच्या मूत्रपिंडाचे कार्य अचानक थांबू शकते.
पुढील काही दिवस अशीच परिस्थिती राहिल्यास त्यांना डायलिसिस घेण्याची आवश्यकता भासू शकते. ज्या वेगाने त्यांचा आजार वाढत आहे ते चिंताजनक आहे.
त्यांना 20 वर्षांपासून मधुमेहदेखील आहे, त्यामुळे आतल्या अवयवाचे नुकसान होण्यास आधीच सुरुवात झाली आहे. आत्ता त्यांना खूप काळजी घेण्याची गरज आहे. असे डॉक्टर म्हणाले आहे.