सध्या पावसाळ्याचा कालावधी सुरू असून संपूर्ण भारतामध्ये पावसाने जोरदार हजेरी लावल्याचे चित्र असून या पावसाच्या आल्हाददायक वातावरणामध्ये सगळीकडे निसर्गाने हिरवी चादर पांगरली आहे आणि त्यावर धुक्याचा मुलामा चढलेला असल्याने निसर्गसृष्टी जणू काही न्हावुन निघाली आहे.
त्यामुळे या कालावधीतले निसर्गाचे सौंदर्य पाहण्यासाठी आणि मनाला निरव शांतता लाभावी याकरिता अनेकजण ट्रिप प्लॅन करतात व ही ट्रीप प्लान करताना कधी कधी ती मित्रांसोबत तर कधी कुटुंबातील सदस्यांसोबत प्लान केली जाते.
त्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी असलेले निसर्गरम्य स्थळे तसेच धबधबे असलेल्या ठिकाणी भेट दिली जाते तर काहीजण हिल स्टेशनला भेट देतात. तुम्हाला देखील जर या सप्टेंबर महिन्यामध्ये फिरायला जायचा प्लान बनवायचा असेल व भारतातील एखाद्या निसर्गरम्य हिल स्टेशनला भेट द्यायची असेल तर या लेखामध्ये काही भारतातील महत्त्वाच्या हिल स्टेशनची माहिती दिलेली आहे व ती नक्कीच तुमच्या कामी येऊ शकते.
ही आहेत भारतातील महत्त्वाची नैसर्गिक हिल स्टेशन
1- शिमला– शिमला हे प्रत्येकाला माहीत असलेले ठिकाण असून हे एक भारतातील प्रसिद्ध असेल स्टेशन म्हणून ओळखले जाते. शिमल्याला भारतातीलच नव्हे तर विदेशातील देखील अनेक पर्यटक दरवर्षी भेट देत असतात.
या ठिकाणी असलेल्या निसर्गरम्य दऱ्या व प्राचीन मंदिरे तसेच वास्तू कलेचा अप्रतिम असा नमुना पाहायला मिळतो. तुम्हाला जर ट्रेकिंग आणि हायकिंगचा छंद असेल तर तुम्हाला सिमला हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो.
2- अनामुडी– भारतातील हे एक सर्वोच्च शिखर म्हणून ओळखले जाते व ते केरळ राज्यामध्ये आहे.या ठिकाणी असलेल्या सुंदर दऱ्याखोऱ्या, प्राचीन मंदिरे तसेच वन्यजीव सफारी पर्यटकांना खूप मोठ्या प्रमाणावर आकर्षित करते.
अनामुडीला देखील देश-विदेशातील लाखो पर्यटक दरवर्षी भेट देत असतात व या ठिकाणी तुम्ही वाईल्ड लाइफ सफारी, ट्रेकिंग आणि हायकिंगचा आनंद घेऊ शकतात. त्यामुळे अनामुडी हे ठिकाण सप्टेंबरमध्ये फिरण्यासाठी खूप चांगला पर्याय ठरू शकते.
3- मनाली– शिमला पाठोपाठ मनाली हे एक सुंदर हिल स्टेशन असून या ठिकाणी निसर्ग सौंदर्य पाहण्याची एक वेगळीच मजा असते व हीच मजा पर्यटकांना या ठिकाणी वेधून घेते. तुम्ही जर मनालीला भेट दिली तर या ठिकाणी तुम्ही पॅराग्लायडिंग तसेच राफ्टिंग, ट्रेकिंग आणि स्किंइगचा आनंद घेऊ शकतात.
4- दार्जीलिंग– दार्जिलिंग हे देखील एक सुंदर हिल स्टेशन असून ते पश्चिम बंगालमध्ये आहे व हिमालयाच्या पायथ्याशी वसलेले एक शहर आहे. या ठिकाणी देखील तुम्हाला निसर्गरम्य असे डोंगर व दऱ्या पाहायला मिळतात.
या ठिकाणी असलेली अलौकिक निसर्गरम्य सौंदर्य मनाला मोहून टाकते.तुम्हाला जर ट्रेकिंग तसे हायकिंगची आवड असेल तर दार्जिलिंग हे ठिकाण तुमच्यासाठी खूप चांगला ऑप्शन ठरते. दुसरे म्हणजे तुम्ही जर दार्जिलिंगला गेला तर या ठिकाणी असलेल्या चहाच्या बागांना भेट देऊन तुम्ही अविस्मरणीय अशी ट्रीप बनवू शकता.