LIC Super Plan : भारताची एकमेव सरकारी विमा कंपनी एलआयसीने गुंतवणूकदारांसाठी एक मस्त योजना आणली आहे. या योजनेत गुंतवणूकदार अवघे काही रुपये गुंतवून लाखो रुपये कमवू शकतात. या गुंतवणुकीमुळे तुमचे पुढील भविष्य सुखकर जाईल.
एलआयसी आधार शिला योजना असे योजनेचे नाव आहे. या योजनेत तुम्ही फक्त ५८ रुपये गुंतवून त्यामध्ये मुदत पूर्ण झाल्यानंतर तुम्ही ८ लाख रुपये मिळवू शकता. एलआयसीने ही योजना खास मुलींसाठी आणली आहे.
10 ते 20 वर्षे योजनेचा कालावधी
या विम्याअंतर्गत दिलेली किमान मूळ रक्कम रु.75,000 प्रति जीवन आहे, LIC आधार शिला योजनेंतर्गत कमाल मूळ रक्कम रु.3 लाख आहे. त्यात नमूद केले आहे की LIC आधार शिला पॉलिसी जास्तीत जास्त 3 लाख रुपयांना खरेदी केली जाऊ शकते.
या योजनेचा पूर्ण होण्याचा कालावधी हा १० ते २० वर्षांचा असू शकतो. या योजनेत जर तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर तुम्हाला मासिक, त्रैमासिक, अर्धवार्षिक किंवा वार्षिक प्रीमियम मिळून जातील.
५८ रुपयांमध्ये ८ लाख कसे मिळवणार
जर तुम्हाला ८ लाख रुपये मिळवायचे असतील तर दररोज तुम्हाला ५८ रुपये जमा करावे लागतील. एका वर्षात आधार शिला योजनेत 21,918 रुपये जमा करावे लागतील. जर तुम्ही २० वर्षे या योजनेत पैसे गुंतवले तर ऐकून 4,29,392 रुपये गुंतवणूक कराल. आणि मुदत पूर्ण झाल्यानंतर 7,94,000 रुपयांचा परतावा मिळेल.
8 ते 55 वयोगटातील महिलांसाठी पर्याय
एलआयसीने ही योजना फक्त महिलांसाठी सुरु केली आहे. यामध्ये ८ ते ५५ वयोगटातील सर्व महिला गुंतवणूक करू शकतात. या योजनेत फक्त अशा महिला गुंतवणूक करू शकतात ज्या महिलांना कोणताही शारीरिक आजार नाही.