भारत

LIC Policy Scheme : एलआयसीची भन्नाट योजना! दररोज 166 रुपये गुंतवा आणि मॅच्युरिटीनंतर मिळवा 50 लाख रुपये

Published by
Ahmednagarlive24 Office

LIC Policy Scheme : आजकाल प्रत्येकजण स्वतःच्या किंवा मुलांच्या भविष्यासाठी कुठे ना कुठे गुंतवणूक करत असतो. गुंतवणूक कारण्यासाठ अनेक योजना उपलब्ध आहेत. काही खाजगी आहेत तर काही सरकारी आहेत. भारतातील सर्वात मोठ्या सरकारी विमा कंपनी एलआयसीमध्ये गुंतवणूक करण्याची चांगली संधी आहे.

एलआयसीकडून ग्राहकांसाठी अनेक भन्नाट योजना सादर केल्या जात आहेत. ज्यामध्ये गुंतवणूक करून ग्राहक चांगले पैसे कमवू शकतात. एलआयसीच्या बीमा रत्न पॉलिसीमध्ये गुंतवणूक करून तुम्ही मॅच्युरिटीनंतर लाखो रुपये मिळवू शकता.

जर तुम्हीही एलआयसीच्या योजनांमध्ये गुंतवणूक करू इच्छित असाल तर जवळच्या एलआयसी शाखेमध्ये जाऊन योजनांबद्दल माहिती घेऊन गुंतवणूक करू शकता. गुंतवणूक करण्यासाठी अनेक योजना एलआयसीकडून ग्राहकांसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

ही एक नॉन-लिंक्ड, गैर-सहभागी, वैयक्तिक बचत जीवन विमा योजना आहे जी हमी बोनस देते. या पॉलिसीमध्ये 5 लाख रुपये गुंतवून, गुंतवणूकदारांना मॅच्युरिटीवर 50 लाख रुपये मिळू शकतात, जे प्रारंभिक ठेव रकमेच्या दहापट आहे.

प्रीमियम कसा भरायचा

पॉलिसी धारकाकडे किमान 5 लाख रुपयांची विमा रक्कम असणे आवश्यक आहे आणि या योजनेत गुंतवणूक करण्याचे किमान वय 90 दिवस आहे, तर कमाल वय 55 वर्षे आहे. गुंतवणूकदार त्यांच्या सोयीनुसार मासिक, त्रैमासिक, सहामाही किंवा वार्षिक आधारावर प्रीमियम भरू शकतात.

तुम्हाला पॉलिसीची मुदत 15, 20 आणि 25 वर्षांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. यामधील कोणताही पर्याय तुम्ही निवडू शकता. उदाहरणार्थ, 15 वर्षांच्या मुदतीची निवड करणार्‍या गुंतवणूकदारांना 11 वर्षांसाठी प्रीमियम भरावा लागेल, तर 20 वर्षांच्या मुदतीची निवड करणार्‍यांना 16 वर्षांसाठी प्रीमियम भरावा लागेल आणि 25 वर्षांच्या मुदतीची निवड करणार्‍यांना 21 वर्षे प्रीमियम भरावा लागेल.

दररोज 166 रुपये भरून 9 लाख कमवा

या पॉलिसीमध्ये गुंतवणूक केल्यास तुम्हाला चांगला परतावा मिळू शकतो, कारण 15 वर्षांसाठी गुंतवलेल्या 5 लाख रुपयांच्या विम्याची रक्कम जवळपास 9,00,000 रुपये मिळवू शकते. गुंतवणूकदारांना किमान मासिक प्रीमियम 5,000 रुपये भरावे लागतील, जे दररोज सुमारे 166 रुपयांच्या बचतीच्या समान आहे.

Ahmednagarlive24 Office