Categories: भारत

दिल्लीत लॉकडाऊनची ऐशीतशी ; दिल्लीला होऊ शकतो ‘हा’ धोका

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

दिल्लीमध्ये कोरोनाची लागण झालेल्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. असे असूनही येथिल नागरिक पाहिजे ती सुरक्षा पाळताना दिसत नाहीत. दिल्लीत लॉकडाऊनची पूर्ण ऐशीतशी झाल्याचे चित्र आहे.

कोरोना हॉटस्पॉट ठरलेल्या बड़ा हिंदूराव परिसरात रविवारी सायंकाळी लोकांनी खूप गर्दी केली होती. यामुळे दिल्लीत कोरोना संक्रमणाचा धोका वाढवू शकतो.

दिल्ली पोलिस तसेच आणि विविध मशिदींचे इमाम व मोलाना यांनी आवाहन करूनही येथील नागरिक कायद्याचे पालन करताना दिसत नाहीत. रविवारी बडा हिंदूराव भागात खरेदीसाठी मोठ्या संख्येने लोक जमा झाले होते.

कोरोनाचे सावट असताना किमान सोशल डिस्टन्स पाळणे गरजेचे आहे त्याचेही पालन या ठिकाणी होत नसल्याचं समोर आले आहे. कोरोना संसर्गाचा धोका लक्षात घेता, सर्व धर्मप्रमुखांनी रमजानच्या काळातही लॉकडाऊन पाळण्याचे आवाहन केले आहे.

परंतु याचा कोणताही परिणाम नागरिकांवर झालेला नसून येथे उपस्थित पोलिस कर्मचारीही त्याचा अवलंब करून घेण्यास असमर्थ ठरले आहेत.

अहमदनगर लाईव्ह 24