अहमदनगर Live24 टीम,28 ऑक्टोबर 2020 :- कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव आणि त्यातून सावरणारी जनता, आता कमी रुग्णांत होत चाललेली घसरण हे समीकरण देशासाठी चांगले आहे.
मागील 13 दिवसांमध्ये तब्बल 10 लाख लोकांनी कोरोनावर मात केल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. 23 ते 29 स्पटेंबरच्या दरम्यान रोज सरासरी 83,232 नवे रुग्ण सापडत होते. 21 ते 27 ऑक्टोबरच्या दरम्यान ही संख्या 49,909 हजारांवर गेली.
एकंदरीत हि परिस्थिती पाहता केंद्राने कंटॅमिनेटेड झोनधमध्ये सक्तीचा लॉकडाऊन हा 30 नोव्हेंबरपर्यंत सुरुच राहील असे आदेश केंद्राकडून देण्यात आले आहे. 30 सप्टेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या नियमावलीत नव्यानं कोणत्याही प्रकारची मुभा न देण्याचा निर्णय केंद्राकडून घेण्यात आला आहे.
केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं आखून दिलेल्या मार्गदर्शक तत्वांच्या आधारावर जिल्हास्तरीय पातळीवर प्रतिबंधित क्षेत्रांसंबंधीची माहिती घेण्यात येत आहे. दरम्यान, पहिल्या ल़ॉकडाऊनपासून ठप्प झालेल्या अनेक सेवा प्रतिबंधित क्षेत्र वगळता इतर अनेक भागांमध्ये पुन्हा सुरु करण्यात आल्या आहेत.
या सर्व सेवा कोणत्याही बदलांविना सुरुच राहतील. काही महत्त्वाच्या नियमांचं पालन करत मेट्रो सेवा, लोकल सेवा, मनोरंजन स्थळं, हॉटेलं, रेस्तराँ, प्रशिक्षण केंद्र आणि धार्मिक स्थळंही सुरु राहणार आहेत.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved