भारत

Upcoming Bikes : नवीन बाईक घेताय? जरा थांबा! भारतीय बाजारात लॉन्च होणार या जबरदस्त बाईक्स, पहा यादी…

Published by
Ahmednagarlive24 Office

Upcoming Bikes : भारतीय ऑटो बाजारात अनेक कंपनीच्या बाईक्स आणि स्कूटर उपलब्ध आहेत. पण ग्राहकांसाठी कंपनीकडून आणखी नवनवीन फीचर्स असणाऱ्या दमदार बाईक्स लॉन्च केल्या जात आहेत. जर तुम्हीही बाईक खरेदी करण्याचा विचार करत असाल तर जरा थांबा बाजारात आणखी नवीन बाईक्स लॉन्च होणार आहेत.

भारतात वेगवेगळ्या कंपनीच्या बाईक्स लॉन्च होणार आहेत. कोणत्या बाईक्स लॉन्च होणार आहेत त्याची यादी खाली पाहू शकता.

Honda ची नवीन 100cc बाईक

होंडा कंपनीची 100cc बाईक लॉन्च होणार आहे. ही बाईक हीरो स्प्लेंडर, एचएफ डिलक्स, बजाज प्लॅटिना यांसारख्या बाईकला टक्कर देईल असे कंपनीचे म्हणणे आहे. ही बाईक सिंगल-सिलेंडर, एअर-कूल्ड, इंधन-इंजेक्टेड इंजिनसह येऊ शकते,

Bajaj Pulsar 220F

भारतामध्ये बजाज कंपनीच्या अनेक बाईक अधिक लोकप्रिय आहेत. तसेच अजूनही या कंपनीच्या गाड्यांचा खप अधिक आहे. आता कंपनीकडून Pulsar 220F लॉन्च केली जाणार आहे.

या बाईकमध्ये सिंगल-सिलेंडर, एअर-कूल्ड, FI इंजिन मिळेल, जे 20bhp आणि 18.5Nm जनरेट करते, 5-स्पीड गिअरबॉक्सशी जोडलेली ही बाईक लवकरच ग्राहकांच्या भेटीला येणार आहे.

TVS iQube ST

TVS कंपनीकडून आता आणखी नवीन स्कूटर लॉन्च केल्या जाणार आहेत. मे महिन्यात कंपनीच्या नवीन स्कूटर लॉन्च होण्याची शक्यता आहे. स्कूटरच्या किमतीबाबत कंपनीने अद्याप माहिती दिलेली नाही. कंपनी iQube इलेक्ट्रिक स्कूटर सिरीज लॉन्च करणार आहे.

Triumph Street Triple R, RS

ट्रायम्फ मोटरसायकल १५ मार्च २०२३ रोजी भारतात नवीन स्ट्रीट ट्रिपल आर आणि स्ट्रीट ट्रिपल आरएस लॉन्च करेल. त्यांची डिलिव्हरी या वर्षी एप्रिलमध्ये सुरू होण्याची शक्यता आहे. नवीन स्ट्रीट ट्रिपल ‘765’ श्रेणी 765cc, इनलाइन-3 सिलेंडर इंजिनसह येईल, जे 128bhp (पूर्वीपेक्षा 6 bhp जास्त) आणि 80 Nm जनरेट करेल.

Updated RE 650 Twins

Royal Enfield च्या अनेक बाईक सध्या बाजारात धुमाकूळ घालत आहेत. तसेच तरुणांमध्ये या कंपनीच्या अनेक बाईक्सची क्रेझ आहे. आता कंपनीकडून नवीन बाईक लॉन्च केली जाणार आहे. RE 650 Twins असे या बाईक नाव असेल.

Ahmednagarlive24 Office