भारत

Lord Shiva And Bhang History : भगवान शिव आणि गांजाचा काय संबंध आहे? जाणून घ्या त्यामागील रंजक कहाणी

Published by
Ahmednagarlive24 Office

Lord Shiva And Bhang History : हिंदू धर्मामध्ये भगवान शिवाला खूप महत्व आहे. दरवर्षी भगवान शिवाच्या धार्मिक स्थळाला लाखो भाविक भेट देत असतात. तसेच अनेकांना भगवान शिवाच्या राजनक गोष्टी जाणून घेयला देखील आवडत असते.

भारतासोबतच जगभरात अनेकजण भगवान शिवाचे भक्त आहेत. तसेच भारतातील भाविकांची भगवान शिवावर अतूट भक्ती आहे. भगवान शिवाच्या आज तुम्हाला अशा एका गोष्टीबद्दल सांगणार आहोत जी तुम्हालाही माहिती नसेल.

भारतामध्ये भगवान शिवाची महाशिवरात्रीला मोठी पूजा तसेच दुग्धाभिषेक केले जातात. या दिवशी अनेकजण भगवान शिवाला भांग अर्पण करत असतात. तसेच विशिष्ट प्रकारची पूजा देखील करत असतात.

भगवान शिव आणि भांग अनेकदा हे समीकरण तुम्ही ऐकले असेल. अनेकजण भगवान शिवाला भांग अर्पण करत असतात. भगवान शिवाला भांग अर्पण करण्यामागे एक कारण आहे.

पण तुम्ही कधी विचार केला आहे की भगवान शिवाला गांजाची इतकी आवड का आहे? भारतात दरवर्षी लाखो लोक गांजांचे सेवन केल्याने मरण पावतात. मात्र भगवान शिवाला याची आवड असण्यामागे एक रंजक कारण आहे.

भारतात शेकडो वर्षांपासून गांजाचे सेवन कोणत्या ना कोणत्या स्वरूपात केले जात आहे. वैदिक शास्त्रांमध्ये, भांग पाच पवित्र वनस्पतींपैकी एक आहे आणि आनंद, दयाळूपणा आणि स्वातंत्र्याचा स्रोत आहे.

एका कथेनुसार, भगवान शिव एकदा आपल्या कुटुंबाशी वाद घालत होते आणि म्हणून ते एका शेतात गेले, जेथे ते गांजाच्या रोपाखाली झोपले. झोपेतून उठल्यावर त्यांनी काही प्रमाणात भांग खाल्ला आणि लगेचच त्यांच्या अंगात ताजेपणा जाणवला. तेव्हापासून भांग हा त्यांचा आवडीचा पदार्थ बनला आहे.

दुसऱ्या कथेच्या मान्यतेनुसार, हे समुद्रमंथनाशी संबंधित आहे, जेव्हा देव आणि दानव अमृत, अमरत्वाचे पेय मिळविण्यासाठी समुद्रमंथन करण्यासाठी आले होते. या मंथनाचे एक फळ म्हणजे विष हलाहल हे विश्वातील सर्वात विषारी विष होते, ज्याच्या धुरामुळे देव आणि राक्षस दोघांचाही मृत्यू होऊ शकतो.

शिवाने सर्वांना वाचवण्यासाठी ते विष प्यायले आणि त्यानंतर त्यांना ते पचन होण्यासाठी भांग देण्यात आली. हेच कारण आहे की शिव केवळ भांगाशी संबंधित नाही, तर अक्षरशः भांगचा सर्वव्यापी भगवान म्हणून संबोधले जाते.

Ahmednagarlive24 Office