भारत

Government Scheme : होळीदिवशी महिलांची लागली लॉटरी! सरकार दरमहा देणार 1000 रुपये, आजच असा करा अर्ज

Published by
Ahmednagarlive24 Office

Government Scheme : केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडून महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी अनेक योजना राबवल्या जात आहेत. त्यामुळे देशातील लाखो महिलांना याचा फायदा होत आहे. आता सरकारकडून आणखी एक योजना सुरु करण्यात आली आहे.

सरकारकडून सुरु करण्यात आलेल्या योजनेतून महिलांना दरमहा १ हजार रुपये दिले जात आहेत. तसेच वर्षाला १२ हजार रुपये दिले जात आहेत. त्यामुळे महिलांना आर्थिक हातभार लागत आहे. सरकारच्या या योजनेचा लाखो महिलांना फायदा होणार आहे.

महिलांना बळकटीकरण देण्यासाठी आणि त्यांना सशक्त करण्यासाठी एक योजना सुरु करण्यात आली आहे. लाडली बहन योजना असे सरकारकडून सुरु करण्यात आलेल्या योजनेचे नाव आहे. या योजनेद्वारे महिलांना पैसे दिले जाणार आहेत.

मध्य प्रदेश सरकारकडून ही योजना सुरु करण्यात आली आहे. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी महिलांसाठी या योजनेची घोषणा केली आहे. या योजनेअंतर्गत महिलांना दरमहा १ हजार रुपये दिले जात आहेत.

या योजनेमुळे महिलांना घर चालवण्यात आर्थिक मदत होईल. तसेच काही महिलांना शिक्षणासाठीही या योजेनची मदत होणार आहे. या योजनेमुळे लाखो महिला आर्थिक दृष्ट्या मजबूत होतील.

लाडली बहन योजना काय आहे?

ही योजना मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी महिलांना सक्षम आणि बळकट करण्यासाठी सुरु केली आहे. महिलांना कोणत्याही मदतीशिवाय मिळणाऱ्या रकमेतून घर चालवता येते.

ज्या महिला आर्थिकदृष्ट्या कमकुवत आहेत आणि ज्यांच्याकडे पाच एकर किंवा त्यापेक्षा कमी जमीन आहे, त्यांच्यासाठी ही योजना राबवण्यात आली आहे. महिलांना प्रगत करण्यासाठी लाडली बहन योजना ही योजना सुरू करण्यात आली आहे.

कोणत्या महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतात

1. या योजनेचा लाभ फक्त मध्य प्रदेशातील महिलाच घेऊ शकतात.
2. अर्जासाठी महिलांचे वय 23 वर्षांपेक्षा कमी आणि 60 वर्षांपेक्षा जास्त नसावे.
3. शाळा किंवा महाविद्यालयात शिकणाऱ्या महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.
4. ही विशेष योजना फक्त मागासवर्गीय, अनुसूचित जाती आणि जमातीतील महिलांसाठी करण्यात आली आहे.
5.10 जूनपासून बहिणींच्या खात्यात पैसे येणे सुरू होईल.
6. अर्जासाठी अधिकाऱ्यांची टीम गावोगावी जाईल.

अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे

1. आधार कार्ड
2. पासपोर्ट आकाराचा फोटो
3. बँक खाते तपशील
4. मोबाईल क्रमांक
5. निवास प्रमाणपत्र
6. जन्म प्रमाणपत्र

अर्ज कसा करायचा

मध्य प्रदेश सरकार या योजनेचा लाभ लाखो महिलांना देणार आहे. महिलांना या योजनेसाठी अर्ज करण्यात यावा यासाठी सरकारकडून राज्यात अनेक ठिकाणी कॅम्प लावले जाणार आहेत. या ठिकाणी जाऊन महिला फॉर्म भरून अर्ज करू शकतात.

Ahmednagarlive24 Office