LPG Cylinder Price : देशात दिवसेंदिवस महागाई वाढत चालली आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक हैराण झाले आहेत. पेट्रोल डिझेलसोबत गॅसच्या कितमीत देखील गगनाला भिडल्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठा आर्थिक फटका बसत आहे.
गॅसच्या किमती वाढल्याने ग्रामीण भागातील अनेक गरीब नागरिकांना गॅस खरेदी करणे शक्य होत नाही. त्यामुळे अनेकजण सध्या चुलीवरती स्वयंपाक करत आहेत. त्यामुळे गरीब नागरिकांना आता गॅस सिलिंडर खरेदी करणे शक्य राहिलेले नाही.
सरकारकडून नागरिकांना दिलासा देण्यासाठी एक योजना सुरु करण्यात येत आहे. त्याच्या अंतर्गत गरीब नागरिक कमी दरात गॅस सिलिंडर खरेदी करू शकतात. त्यामुळे नागरिकांच्या पैशांची बचत देखील होईल.
सरकारकडून आता गरीब नागरिकांसाठी ५०० रुपयांमध्ये गॅस सिलिंडर देण्याची योजना आखली जात आहे. त्यामुळे आता नागरिकांना १ हजार रुपयांच्या पुढे गेलेला गॅस सिलिंडर फक्त ५०० रुपयांमध्ये मिळू शकतो.
या नागरिकांना LPG सिलेंडर फक्त 500 रुपयांमध्ये मिळेल
सध्या देशामध्ये गॅस सिलिंडरच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना गॅस सिलिंडर खरेदी करणे शक्य होत नाही. मात्र आता सर्वसामान्य नागरिक सहज गॅस सिलिंडर खरेदी करू शकतात.
सध्या भारतामध्ये LPG गॅस सिलेंडरची किंमत 1150 रुपये आहे. तसेच या किमती वाढतच आहेत. त्यामुळे नागरिकांना जास्त दराने गॅस सिलिंडर खरेदी करावा लागत आहे. तसेच काही नागरिकांना इतके पैसे देऊन गॅस सिलिंडर करणे शक्य नाही.
पण आता BPL कार्डधारक आणि PM उज्ज्वला योजनेशी संबंधित कुटुंबांना LPG सिलिंडर फक्त 500 रुपयांमध्ये दिले जात आहेत. तुम्हीही BPL कार्ड धारक असाल तर या योजेनचा लाभ घेऊ शकता.