LPG Subsidy News : एलपीजी गॅस धारकांसाठी खुशखबर! मोदी सरकार पुन्हा सुरु करणार गॅस सबसिडी, जाणून घ्या सविस्तर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

LPG Subsidy News : देशात सध्या महागाई दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक हैराण झाले आहेत. गॅसच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. त्यामुळे गॅसधारकांच्या खिशावर जास्तीचा आर्थिक भार पडत आहे. मात्र आता गॅस धारकांसाठी चांगली बातमी आहे.

कारण आता मोदी सरकारकडून पुन्हा एकदा एलपीजी गॅस सिलिंडरवर सबसिडी दिली जाणार आहे. त्यामुळे येत्या २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मोदी सरकारकडून एलपीजी गॅस सबसिडी पुन्हा एकदा सुरु केली जाऊ शकते.

गॅस सबसिडी सुरु केल्यानंतर देशातील करोडो नागरिकांना याचा फायदा होणार आहे. तसेच मात्र पूर्वीच्या गॅस सबसिडी नियमांपेक्षा यावेळीच्या गॅस सबसिडी नियमांमध्ये मोठा बदल असण्याची शक्यता आहे.

पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या ऊर्जा संक्रमण समितीच्या अहवालात वर्षाला सात ते आठ सिलिंडरवर सबसिडी देण्याची शिफारस करण्यात आली आहे. मात्र सरकारकडून अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.

मोदी सरकारकडून ९.५ कोटी कुटुंबांना एलपीजी कनेक्शन देण्यात आले

देशातील गरीब नागरिकांना मोदी सरकारकडून मोफत गॅस सिलिंडरचा लाभ देण्यात आला आहे. देशातील सर्व नागरिकांना गॅस कनेक्शन मिळावे हा सरकारचा यामागचा उद्देश आहे. त्यामुळे मोदी सरकारकडून प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत मोफत गॅस कनेक्शन दिले जात आहे.

मोदी सरकारकडून २०१६ मध्ये प्रधानमंत्री उज्वला योजना सुरु करण्यात आली आहे. ही योजना सुरु केल्यापासून सरकारकडून सप्टेंबर २०२२ पर्यंत 9.5 कोटी गरीब नागरिकांना मोफत गॅस कनेक्शन दिले गेले आहे. ज्या नागरिकांचे मासिक उत्पन्न कमी आहे अशा नागरिकांना मोदी सरकारकडून मोफत गॅस कनेक्शन दिले जात आहे.

यापूर्वी 12 सिलिंडरवर सबसिडी मिळत होती

देशातील गॅस धारकरांना सरकारकडून १२ सिलिंडरवर सबसिडी दिली जात होती. मात्र आता सरकारकडून ही सबसिडी बंद करण्यात आली आहे. तसेच गॅसच्या किमती देखील अधिक वाढल्याने ग्राहकांना आर्थिक फटका बसत आहे.

केंद्र सरकारकडून आता गॅस कनेक्शन असणाऱ्या नागरिकांना पुन्हा एकदा सात ते आठ एलपीजी सिलिंडरवर सबसिडी दिली जाणार आहे. त्यामुळे आता एलपीजी ग्राहकांना पुन्हा एकदा फायदा होणार आहे.