Maharashtra Board 10th 12th Results : महाराष्ट्रातील 10वी आणि 12वी च्या लाखो विद्यार्थ्यांनी मार्च आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये परीक्षा दिलेली आहे. मात्र आता या विद्यार्थ्यांना प्रतीक्षा आहे ती निकालाची. अद्याप महाराष्ट्र्र बोर्डाकडून विद्यार्थ्यांना निकालाबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही.
10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांना एक चांगली बातमी आहे. कारण 20 मे नंतर निकाल लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 20 मे ते 30मे च्या दरम्यान १०वी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर केला जाऊ शकतो. महाराष्ट्र बोर्डाकडून दहावी आणि बारावीच्या निकालाच्या तारखेची घोषणा केली जाऊ शकते.
महाराष्ट्र बोर्डाकडून SSC परीक्षा 2023 ही 2 मार्च 2023 ते 25 मार्च 2023 या कालावधीत घेण्यात आली आहे. HSC परीक्षा 2023 ही 21 फेब्रुवारी 2023 ते 21 मार्च 2023 या कालावधीत झाली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना 20 मे ते 30 मे पर्यंत निकाल लागण्याची अपेक्षा आहे.
MSBSHSE ने महाराष्ट्र बोर्डाकडून बारावीच्या विद्यार्थ्यांच्या निकालाची तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी 20मे नंतर MHT CET 2023ची परीक्षा आयोजित केली जाऊ शकते.
त्यामुळे 20 मे नंतर बारावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल लागणे अपेक्षित आहे. गेल्या वर्षीच्या अंदाजानुसार MHT CET परीक्षा संपल्यानंतर बारावीच्या बोर्डाचा निकाल लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
बारावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांसाठी पीसीएम अभ्यासक्रमांसाठी एमएचटी सीईटी 2023 ची परीक्षा 9 मे ते 14 मे 2023 आणि पीसीबी परीक्षा 15 ते 20 मे 2023 दरम्यान आयोजित केली जाईल.
गेल्या काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रातील बारावीच्या विद्यार्थ्यांची बोर्डाची परीक्षा झाली होती. त्यामुळे विद्यार्थी आता निकालाच्या प्रतीक्षेत आहेत. बारावीच्या परीक्षेसाठी महाराष्ट्रातून एकूण 13 लाखांहून अधिक बसले होते.
तुम्ही या वेबसाइट्सवरून निकाल तपासू शकता
तुम्ही अशा प्रकारे तपासू शकता निकाल
mahresult.nic.in या MAHA बोर्डाच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
मुख्यपृष्ठावर, निकालाची लिंक शोधा.
आवश्यक तपशील जसे की रोल नंबर, जन्मतारीख प्रविष्ट करा.
‘पहा निकाल’ या पर्यायावर क्लिक करा.
महाराष्ट्र एसएससीचा निकाल स्क्रीनवर उघडेल.
ते डाउनलोड करा आणि भविष्यातील संदर्भासाठी त्याची प्रिंटआउट घ्या.
महाराष्ट्र बोर्ड एसएससी परीक्षा 2023 साठी सुमारे 15,77,256 उमेदवारांनी नोंदणी केली आहे, त्यापैकी 8,44,116 मुले आणि 7,33,067 मुली परीक्षेला बसल्या आहेत. तर बारावीच्या परीक्षेसाठी सुमारे 14 लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती.