Maharashtra Rain Alert : महाराष्ट्रात पुढील ५ दिवस विजांच्या कडकडाटासह कोसळणार मुसळधार पाऊस, पहा हवामान अंदाज

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra Rain Alert : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यांमधील हवामानात बदल पाहायला मिळत आहे. हवामानात बदल झाल्यामुळे अनेक राज्यांमध्ये अवकाळी पावसाचा तडाखा पाहायाला मिळत आहे. तसेच अवकाळी पावसामुळे राज्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे.

आता पुढील ५ दिवस पुन्हा एकदा महाराष्ट्रात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा राज्यात मुसळधार पाऊस कोसळणार आहे.

गेल्या काही दिवसांपासून वातावरणातील उष्णतेत प्रचंड वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे राज्यातील नागरिक उकाड्याने हैराण झाले आहेत. तसेच रविवारी नवी मुंबईतील खारघरमध्ये 14 जणांचा उष्माघाताने मृत्यू झाला होता.

महाराष्ट्रातील अनेक भागातील तापमान हे 40 अंश सेल्सिअसच्या पुढे गेले आहे. तसेच आता पुन्हा एकदा राज्यातील हवामान बदलून मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.

पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रातील अनेक भागात पाऊस कोसळला आहे. तसेच विदर्भातील वाशिम आणि बुलढाण्यात गारांचा पाऊस पाहायला मिळाला आहे. मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्राच्या अनेक भागात ढगाळ वातावरण तयार झाले आहे.

हवामान खात्याकडून पुढील ५ दिवस मुसळधार पाऊस आणि ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना अवकाळीचा फटका बसू शकतो. तसेच शेतकऱ्यांना सावध राहण्याचा इशारा देखील देण्यात आला आहे.

महाराष्ट्रातील या जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा जारी

पुणे, सातारा, अहमदनगर, नाशिक, धुळे, जळगाव, कोल्हापूर, सांगली, बीड, छत्रपती संभाजी नगर, जालना, बुलढाणा, वाशीम, अकोला, अमरावती, यवतमाळ, नागपूर जिल्ह्यात पुढील पाच दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तसेच गारपीटीचीही शक्यता वर्तवण्यात आली आहे.

दाबाची स्थिती निर्माण झाल्याने अवकाळी पाऊस

मध्य महाराष्ट्र ते तामिळनाडूपर्यंत कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्यामुळे राज्यात अचानक हवामानात बदल होत आहे. कमी दाबाचा पट्टा तेलंगणा ते दक्षिण तामिळनाडूपर्यंत पसरला आहे. त्यामुळे आज मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे.