Ahmednagarlive24 Marathi News
Marathi Breaking News, Marathi Live Batmya, मराठी बातम्या

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात पुन्हा अवकाळी पावसाची शक्यता! हवामान खात्याने वर्तवला एप्रिल अखेरपर्यंत पावसाचा अंदाज

Maharashtra Weather Update : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील हवामानात बदल पाहायला मिळत आहे. तसेच महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. तसेच आता हवामान खात्याकडून पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

हवामान खात्याकडून आता एप्रिलच्या अखेरीस महाराष्ट्रात पुन्हा एकदा अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे टेन्शन पुन्हा एकदा वाढले आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात एप्रिल अखेरपर्यंत मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

सध्या तापमानात कमालीची वाढ झालीय आहे. महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये तापमान ४० अंश सेल्सिअसच्या पुढे गेले आहे. त्यामुळे नागरिक उकाड्याने हैराण झाले आहेत. उष्णता वाढल्याने राज्यात नागरिकांचे मृत्यू देखील होत आहेत.

पुढील दोन-तीन दिवस कोकण आणि मुंबई-ठाण्यातील तापमान कोरडे राहणार आहे. ओलसर हवा, उच्च आर्द्रता आणि तापमानामुळे कोकणात उष्णता वाढण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.

ठाणे आणि मुंबईमध्ये वातावरण जरी कोरडे राहणार असले तरी आर्द्रतेमुळे उष्णता जाणवण्याची शक्यता आहे. तसेच राज्यातील अनेक भागात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

पुढील ५ दिवस विदर्भात अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. आज २२ एप्रिल रोजी विदर्भात अनेक ठिकाणी गारपिटीची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तसेच वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाट होण्याचीही शक्यता वर्तवण्यात आलिया हे.

बुलढाण्यातील संग्रामपूर, जळगाव जामोद, शेगाव परिसरात काल दुपारी वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला. या ठिकाणी सुमारे तीन तास जोरदार वारा आणि पावसाने हजेरी लावली होती.

मध्य प्रदेश, विदर्भ आणि छत्तीसगडमध्ये पाऊस पडू शकतो

पूर्व-पश्चिम भारतामध्ये तीन दिवस हलका ते मध्यम पाऊस पडण्याचा इशारा देण्यात आला आहे. याशिवाय मध्य प्रदेश, विदर्भ, छत्तीसगडमध्ये पाच दिवस हलका पाऊस पडणार आहे. बिहार, झारखंड, बंगाल, सिक्कीम, ओडिशामध्ये पाच दिवस हलक्या पावसाची शक्यता आहे.

ओडिशामध्ये 22-23 रोजी आणि बिहारमध्ये 24 एप्रिल रोजी गारपीट होईल. दुसरीकडे कोस्टल आंध्र प्रदेश, तेलंगणा, रायलसीमा, अंतर्गत कर्नाटक, तामिळनाडू, पुडुचेरी, कराईकल, केरळमध्ये पाच दिवस हलका पाऊस पडू शकतो.