Mahindra Bike : रॉयल एनफिल्डला टक्कर देण्यासाठी महिंद्राची जबरदस्त बाईक होणार लॉन्च! जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Mahindra Bike : रॉयल एनफिल्डच्या अनेक टू व्हीलर भारतीय बाजारामध्ये वर्चस्व गाजवत आहेत. तसेच तरुणांमध्ये रॉयल एनफिल्डच्या टू व्हीलर बाईकची एक वेगळीच क्रेझ आहे. पण आता रॉयल एनफिल्डच्या बाईकला टक्कर देण्यासाठी महिंद्राची बाईक सज्ज झाली आहे.

भारतीय बाजारात महिंद्रा कंपनीची जबरदस्त बाईक लॉन्च होणार आहे. या बाईकमध्ये अनेक धमाकेदार फीचर्स कंपनीकडून देण्यात येणार असल्याने ग्राहकांना परिपूर्ण वैशिष्ट्ये असलेली बाईक खरेदी करण्याची संधी मिळणार आहे.

ही असेल महिंद्राची बाईक

Mahindra BSA Gold Star 65 असे या बाईकचे नाव आहे. रॉयल एनफिल्डपेक्षा एक वेगळाच लूक या बाईकमध्ये देण्यात आला आहे. त्यामुळे ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळू शकतो.

सध्या या बाईकची विक्री युनायटेड किंगडममध्ये सुरु आहे. 1950 च्या दशकात मोटरसायकल विभागातील BSA हा एक मजबूत ब्रँड होता, त्यानंतर 2016 मध्ये महिंद्राने तो विकत घेतला.

महिंद्रा BSA गोल्ड स्टार 650 पॉवरट्रेन

महिंद्रा कंपनीकडून रॉयल एनफिल्डला टक्कर नवीन बाईक लॉन्च केली जाणार आहे. या बाइकला सिंगल सिलिंडर आणि चार व्हॉल्व्हसह 652cc लिक्विड कूल्ड इंजिन मिळते, जे 44bhp पॉवरसह 54Nm कमाल टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. तसेच, ट्रान्समिशनसाठी 5-स्पीड गिअरबॉक्स उपलब्ध आहे.

किंमत आणि लॉन्च तारीख

या बाईकबद्दल कंपनीकडून अद्याप अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. तसेच लॉन्च तारीखही जाहीर करण्यात आलेली नाही. मात्र कंपनीकडून लवकरच ही बाईक भारतीय बाजारपेठेत लॉन्च केली जाणायची शक्यता आहे.

कंपनीकडून भारतीय बाजारपेठेमध्ये ही बाईक ३.५ लाख ते ६ लाख रुपयांच्या किमतीत लॉन्च केली जाण्याची शक्यता आहे. येत्या महिन्यात बाईक लॉन्च होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ही बाईक रॉयल एनफिल्डच्या इंटरसेप्टर 650 ला टक्कर देईल असे सांगण्यात येत आहे.

महिंद्रा कंपनीकडून Mahindra BSA Gold Star 65 या बाईकमध्ये अनेक नवीन फीचर्स देण्यात येणार आहेत. तसेच रॉयल एनफिल्डच्या बाईकपेक्षा या बाईक लूकही वेगळा असणार आहे.