Ahmednagarlive24 Marathi News
Marathi Breaking News, Marathi Live Batmya, मराठी बातम्या

Mahindra Scorpio N Price Hike : स्कॉर्पिओ प्रेमींना मोठा झटका! महिंद्राने स्कॉर्पिओच्या किमती इतक्या रुपयांनी वाढवल्या…

स्कॉर्पिओ N खरेदीदारांची महत्वाची बातमी आहे. कारण आता महिंद्रा कंपनीकडून स्कॉर्पिओ N च्या किमती वाढवण्यात आल्या आहेत. त्यामुळे आता पुन्हा एकदा स्कॉर्पिओ प्रेमींना कार खरेदीसाठी जास्त पैसे मोजावे लागणार आहेत.

Mahindra Scorpio N Price Hike : देशातील प्रसिद्ध वाहन उत्पादक कंपनी महिंद्रा कंपनीने स्कॉर्पिओ प्रेमींना मोठा झटका दिला आहे. कारण आता महिंद्रा कंपनीकडून स्कॉर्पिओ एनच्या किमतीत वाढ केली आहे. त्यामुळे ग्राहकांना आता वाढीव दराने स्कॉर्पिओ एन खरेदी करावी लागणार आहे.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

महिंद्रा कंपनीच्या अनेक कार अधिक लोकप्रिय आहेत. तसेच स्कॉर्पिओ ही कंपनीची सर्वाधिक विक्री होणारी कार आहे. स्कॉर्पिओ कारने अधिक लोकप्रियता मिळवल्यानंतर कंपनीने त्याच सेगमेंटमधील Scorpio N ही नवीन एसयूव्ही कार लॉन्च केली आहे.

Scorpio N या नवीन एसयूव्ही कारला देखील ग्राहकांकडून देखील चांगला प्रतिसाद मिळत आहे. गेल्या वर्षी जूनमध्ये कंपनीकडून Scorpio N लॉन्च केली आहे. कंपनीकडून या कारची किंमत आतापर्यंत दोन वेळा वाढवली आहे.

स्कॉर्पिओ N या एसयूव्ही कारची किंमत कंपनीकडून या वर्षात दोन वेळा वाढवण्यात आली आहे. आता या एसयूव्ही कारची किंमत 51,299 रुपयांनी वाढवण्यात आली आहे. कार लॉन्च झाल्यानंतर या कारची एक्स-शोरूम किंमत 11.99 लाख रुपये होती.

स्कॉर्पिओ एन नवीन किंमत

आता कंपनीकडून कारच्या किमतीमध्ये 51000 रुपयांची वाढ केल्यानंतर नवीन एक्स-शोरूम किंमत आता 13.56 लाख रुपयांवर गेली आहे. Z8L डिझेल एटी 4WD 7-सीटर या टॉप व्हेरिएंटमध्ये हीच किंमत 24.51 लाख रुपये एक्स-शोरूमपर्यंत जाते.

याच वर्षी कंपनीकडून जानेवारी महिन्यामध्ये स्कॉर्पिओ N ची किंमत 15,000 ते 1.01 लाख रुपयांनी तिच्या वेगवेगळ्या व्हेरिएंटनुसार वाढवली होती. आता पुन्हा एकदा महिंद्रा कंपनीकडून ग्राहकांना झटका देण्यात आला आहे.

स्कॉर्पिओ एन वैशिष्ट्ये

महिंद्रा कंपनीकडून स्कॉर्पिओ एन ही कार दोन इंजिन पर्यायांमध्ये लॉन्च करण्यात आली आहे. पहिले 2.2-लिटर mHawk डिझेल इंजिन आहे आणि दुसरे 2.0-लिटर mStallion टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिन आहे.

या दोन्ही इंजिनचे पॉवर आउटपुट 132 PS/300 Nm आणि 175 PS/370 Nm आहेत. याला रीअर-व्हील ड्राइव्ह पर्यायासह 4WD वैशिष्ट्य देखील मिळते. Scorpio N ची स्पर्धा MG Hector Plus, Hyundai Alcazar आणि Tata Safari सारख्या SUV शी आहे.