अहमदनगर Live24 टीम, 3 जानेवारी 2021 :-बीसीसीआय अध्यक्ष आणि टीम इंडियाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीच्या प्रकृतीबाबत मोठी बातमी पुढे येत आहे. गांगुली आता सुखरुप आहे.
गांगुलीच्या जीवाला आता कसलाही धोका नाही, अशी माहिती वुडलॅंड्स रुग्णालयाने दिली आहे. वुडलॅंड्स रुग्णालयाने मेडिकल बुलेटिनद्वारे ही माहिती दिली आहे.
गांगुलीला शनिवारी 2 जानेवारीला जीममध्ये वर्कआऊट करताना ह्रदयविकाराचा सौम्य झटका आला. यानंतर गांगुलीला वुडलॅंड्स रुग्णालयात दाखल केले गेले.
त्यानंतर गांगुलीवर यशस्वीरित्या अँजियोप्लास्टी करण्यात आली. तसेच कोरोना अहवालही नेगेटिव्ह आला. डॉक्टरांनी मेडिकल बुलेटिमध्ये काय सांगितलं? “गांगुलीची प्रकृती स्थिर आहे.
त्याला कसलाही धोका नाही. गांगुली सध्या विश्रांती घेत आहे. गांगुलीचा रक्तदाब 110/70 इतका आहे. तसेच ऑक्सिजन लेवलही 98 इतकी आहे. गांगुलीवर दुसऱ्यांदा अँजियोप्लास्टी करण्याची आवश्यकता आहे.
कारण एकूण हार्ट ब्लॉक काढण्यात आले नाहीत. काही वेळात अँजियोप्लास्टी करण्यात येणार आहे”, अशी माहिती रुग्णालयाकडून देण्यात आली. गांगुलीला ट्रिपल वेसल डिजीजची बाधा गांगुलीला ट्रिपल वेसल डिजीजची ची बाधा आहे.
यामुळे गांगुलीच्या हृदयाला रक्तपुरवठा होण्यास अडथळा निर्माण होत आहे. यामुळेच त्याला ह्रदयविकाराचा सौम्य झटका आला, अशी माहिती डॉक्टरांनी दिली.