Ahmednagarlive24 Marathi News
Marathi Breaking News, Marathi Live Batmya, मराठी बातम्या

Maruti Suzuki Cars Bumper Discount : कर खरेदी करण्याची सुवर्णसंधी! मारुती सुझुकीच्या या कार्सवर मिळतेय मोठी सूट, आजच करा खरेदी

मारुती सुझुकी कंपनीची कार खरेदी करण्याचा प्लॅन असेल तर तुम्हाला देखील मोठी सूट मिळू शकते. कारण कंपनीकडून अनेक कारवर मोठी सूट दिली जात आहे.

Maruti Suzuki Cars Bumper Discount : देशातील सर्वात जास्त कार विक्री करणारी मारुती सुझुकी कंपनीच्या अनेक कारवर बंपर सूर दिली जात आहे. त्यामुळे जर तुम्हीही मारुती सुझुकी कंपनीची कार खरेदी करण्याचा प्लॅन केला असेल तर तुम्हालाही डिस्काउंट मिळू शकतो.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

सध्या देशात सर्वच वस्तू महाग झाल्या आहेत. त्यामुळे कारच्या किमती देखील वाढल्या आहेत. त्यामुळे अनेकांच्या बजेटमध्ये बदल होत आहेत. बजेट कोलमडल्याने अनेकांना कार खरेदी करणे शक्य होत नाही.

मारुती सुझुकी कंपनीच्या अनेक नवीन कार बाजारात दाखल होत आहेत. तसेच या कार जबरदस्त मायलेज आणि कमी किमतीमध्ये उपलब्ध असल्याने अनेकजण या कार खरेदी करत असतात. तसेच मारुती सुझुकी कंपनीच्या कारला ग्राहकांकडून सर्वाधिक पसंती मिळत आहे.

आता मारुती सुझुकी कंपनीच्या वॅगन आर, अल्टो के १०, सेलेरियो आणि एस-प्रेसो या कार्सवर बंपर सूट दिली जात आहे. त्यामुळे यापैकी जर तुम्ही कोणतीही कार खरेदी केली तर तुमच्या पैशांची देखील बचत होईल.

मारुती सुझुकी वॅगन आर

मारुती सुझुकी कंपनीची सर्वाधिक पसंती मिळालेली आणि सर्वाधिक विकली जाणारी वॅगन आर कारवर देखील मोठी सूट दिली जात आहे. Wagon R CNG 1.0L आणि 1.2 या मॉडेलवर 15,000 रुपयांची रोख सवलत दिली जात आहे. तसेच 15,000 ते 20,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस देखील दिला जात आहे.

अल्टो K10

मारुती सुझुकी कंपनीची सर्वात छोटी हॅचबॅक कार म्हणून Alto K10 ला ओळखले जाते. या कारवर कंपनीकडून 15,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि 40,000 रुपयांची रोख सूट दिली जात आहे. तसेच या कारच्या सीएनजी प्रकारांमधील कारवर 35,000 रुपयांची सूट दिली जात आहे.

मारुती सुझुकी सेलेरियो आणि मारुती सुझुकी एस-प्रेसो

मारुती सुझुकी कंपनीकडून सेलेरियो आणि एस-प्रेसो या दोन कारवर देखील मोठी सूट दिली जात आहे. या कारवर कंपनीकडून 30,000 रुपयांपर्यंत रोख सूट आणि 15,000 रुपयांपर्यंतचा एक्सचेंज बोनस दिला जात आहे. त्यामुळे एकूण या कारवर ४५ हजार रुपयांची सूट मिळत आहे.