Maruti Suzuki New Alto : देशातील सर्वाधिक प्रसिद्ध ऑटो कंपनी मारुती सुझुकीच्या नवीन कार आता पुन्हा एकदा ग्राहकांच्या भेटीला येणार आहेत. त्यामुळे आता ग्राहकांना त्यांच्या आवडत्या कंपनीकडून आणखी नवीन कारचा पर्याय उपलब्ध करून दिला जाणार आहे.
मारुती सुझुकीची एकेकाळी सर्वाधिक लोकप्रिय असलेली अल्टो कार आता पुन्हा एकदा ग्राहकांच्या भेटीला येणार आहे. आता या नवीन अल्टो कारमध्ये धमाकेदार फीचर्स देण्यात येणार आहेत.
मारुती सुझुकी कंपनीकडून नवीन अल्टो कारबाबत माहिती देण्यात आली आहे. तसेच नवीन अल्टो कारचा लूक देखील समोर आला आहे. त्यामुळे ग्राहकांना नवीन अल्टो कार सर्वाधिक पसंत येईल असे कंपनीकडून सांगण्यात येत आहे.
मारुती सुझुकी कंपनीकडून कारच्या अनेक फीचर्समध्ये बदल करण्यात येणार आहे. तसेच जुने फीचर्स काढून त्यामध्ये नवीन फीचर्स देण्यात येणार आहेत. अल्टो कारमध्ये सुरक्षेच्या दृष्टिकोनातून देखील नवीन पर्याय समाविष्ट करण्यात येणार आहे.
अल्टो कारचा लूक बदलला जाणार
मारुती सुझुकी कंपनीकडून कारचा बाहेरील लूक पूर्णपणे बदलला जाणारा आहे. नवीन अल्टोमध्ये आकर्षक लूक देण्यात येणार आहे. समोरच्या लोखंडी जाळीला अधिक आधुनिक आणि डायनॅमिक लुक देऊन पुन्हा स्टाइल करण्यात आले आहे.
कारला नवीन हेडलॅम्प, बंपर आणि टेल लॅम्प देखील मिळतात, जे तिच्या एकूण सौंदर्याचा आकर्षण वाढवतात. ही कार लाल, निळा, सिल्व्हर, ग्रे, व्हाईट आणि ग्रीन अशा सहा रंगात उपलब्ध आहे.
अल्टो कारच्या आतमध्ये असणार हे फीचर्स
कारच्या आतील बाजूस डॅशबोर्ड आणि केबिन अधिक आधुनिक आणि वापरकर्त्यासाठी अनुकूल डिझाइनसह अद्यतनित केले गेले आहेत. कार नवीन इन्फोटेनमेंट सिस्टमसह सुसज्ज आहे, ज्यामध्ये 7-इंचाचा टचस्क्रीन डिस्प्ले, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी आणि यूएसबी पोर्ट समाविष्ट आहे.
सुरक्षेच्या दृष्टीने यामध्ये 6 एअरबॅग देण्यात येणार आहेत
नवीन अल्टो कारमध्ये कंपनीकडून इलेक्ट्रॉनिक ब्रेकफोर्स डिस्ट्रिब्युशन (EBD), ड्रायव्हर एअरबॅग आणि रिव्हर्स पार्किंग सेन्सर्ससह अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम (ABS) सह प्रगत सुरक्षा वैशिष्ट्यांच्या श्रेणीसह सादर केली जाणारा आहे.