अहमदनगर Live24 टीम, 28 डिसेंबर 2020 :-सध्या तापमानाचा पारा कमी होऊ लागला आहे. अनेक राज्यांत थंडीची लाट आली आहे. महाराष्ट्रातही थंडीचा कडाका वाढू शकतो. या संभाव्य लाटेच्या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने मार्गदर्शक सूचना जरी केल्या आहेत.
त्यामध्ये नागरिकांना मद्यपान न करण्याची सूचना देण्यात आली आहे. मद्यपानामुळे शरीराचे तापमान कमी होत असल्याने त्याचा नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो, असे विभागाने नमूद केले आहे.
हिमालयाच्या पर्वतरांगांनवरून येणाऱ्या थंड वाऱ्यांना पश्चिमेकडे अडथळा निर्माण झाल्याने रविवार आणि सोमवारी पारा काहीसा वर येऊ शकतो. मात्र, हा अडथळा अल्पकालीन आहे.
त्यामुळे त्यानंतर हिमालयाकडून येणाऱ्या थंड आणि कोरड्या वाऱ्यांमुळे उत्तरेत थंडीची लाट येऊ शकते, असे विभागीय केंद्राचे प्रमुख किलदीप श्रीवास्तव यांनी सांगितले.