MG Comet EV : देशात इंधनाच्या किमती दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. त्यामुळे वाहनधारक हैराण झाले आहेत. तुम्हीही नवीन कार घेण्याचा विचार करत असाल तर तुम्ही इलेक्ट्रिक कार खरेदी करू शकता. इलेक्ट्रिक कार खरेदी केल्यानंतर तुमची पेट्रोल आणि डिझेलपासून मुक्तता होईल.
देशात दिवसेंदिवस आता इलेक्ट्रिक वाहनांच्या मागणीत वाढ होत आहे. तसेच ऑटो कंपन्या देखील इलेक्ट्रिक वाहनांच्या निर्मितीकडे अधिक लक्ष देत आहेत. अनेक कंपन्यांनी इलेक्ट्रिक कार लॉन्च केल्या आहेत.
सध्या बाजारातील इलेक्ट्रिक कार्सच्या किमती खूपच जास्त असल्याने अनेकांना त्या खरेदी करता येत नाहीत. त्यामुळे आता कंपन्यांकडून कमी बजेट असणाऱ्या ग्राहकांसाठी देखील इलेक्ट्रिक कार लॉन्च केल्या जात आहेत.
MG Comet EV डिझाइन
आता भारतात लवकरच आणखी एक इलेक्ट्रिक कार लॉन्च झाली आहे. MG Comet EV असे या नवीन इलेक्ट्रिक कारचे नाव आहे. या कारचे डिझाइन आकर्षक बनवण्यात आले आहे.
या इलेक्ट्रिक कारमध्ये 17-इंच अलॉय व्हील सनरूफ, अॅपल कारप्ले आणि अँड्रॉइड ऑटोसह 10-इंच टच स्क्रीन, अशी उत्तम आणि आधुनिक कार पाहायला मिळेल. या कारमध्ये अनेक धमाकेदार वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत.
इतकी उत्तम बॅटरी आणि रेंज
MG Comet EV या इलेक्ट्रिक कारमध्ये 44 kwh ची लिथम आयन बॅटरी वापरण्यात आली आहे. तसेच ही कार सिंगल चार्जमध्ये 200 किलोमीटरपर्यंतची रेंज देईल असा दावा करण्यात आला आहे.
तसेच कारमध्ये बॅटरी स्वाइपिंगच्या प्रणाली देण्यात येणार असल्याने तुम्ही तिची रेंज 1000 किलोमीटरपर्यंत वाढवू शकता. तसेच ही कार केवळ 8 सेकंदात 100 किलोमीटर प्रति तासाचा वेग गाठू शकेल.
किंमत
MG Comet EV या इलेक्ट्रिक कारची बाजारातील एक्स शोरूम किंमत ५ लाख असू आहे. तसेच ही कार भारतातील प्रत्येक शहरामध्ये उपलब्ध असेल असे नाही. कारण MG चे काही निवडक शहरांमध्येच शोरूम आहेत. जर तुम्हाला ही कार खरेदी करायची असेल तुम्ही अधिकृत ऑनलाईन वेबसाईटवरून बुक करू शकता.