अहमदनगर Live24 टीम, 28 जानेवारी 2021 :- गेल्या आठवड्यात 50 हजाराचा विक्रमी टप्पा ओलांडणाऱ्या शेअर बाजारात असलेला उत्साह यंदाच्या आठवड्यात मावळलेला पाहायला मिळत आहे.
बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) दोन्ही आज रेड मार्क्सवर बंद झाले. बीएसई सेन्सेटिव्ह इंडेक्स सेन्सेक्स (Sensex) गुरुवारी 1.13 टक्क्यांनी घसरुन 535.57 अंकांनी घसरून 46,518.48 वर बंद झाला.
त्याचबरोबर एनएसईचा निफ्टी 150अंकांनी म्हणजेच 1.07 टक्क्यांनी घसरला आणि तो 13,817.50 वर बंद झाला. तथापि, निफ्टी बँकेने आज 73.80 अंक म्हणजेच 0.24 टक्के आणि निफ्टी आयटी 2.18 टक्क्यांनी म्हणजेच 564 अंकांची घसरण नोंदविली.
सेन्सेक्समधील प्रमुख 30 कंपन्यांपैकी 26 कंपन्यांचे समभाग घसरणीत असल्याचे चित्र बाजारातील व्यवहार सुरु झाल्यानंतर समोर आले.
याचा मोठा फटका सन फार्मा, एचडीएफसी आणि डॉक्टर रेड्डीज यांना बाजारातील व्यवहार सुरु झाल्यानंतरच बसला. अव्वल तीसपैकी केवळ चार कंपन्यांचे निर्देशांक सकारात्मक होते.
यामध्ये ओएनजीसी, एटीपीसी, एशियन पेंट्स आणि मारुती सुझुकी इंडिया या चार कंपन्यांचा समावेश आहे. जागतिक बाजारपेठेतही सध्या घसरण पाहायला मिळत आहे.
तसेच अर्थसंकल्पात कोणत्या घोषणा होणार याचाही बाजारावर मोठा दबाव आहे. परिणामी ही मोठी घसरण होत आहे. अर्थसंकल्पासंदर्भातील संभ्रमामुळे गुंतवणुकदारांकडून खरेदीऐवजी विक्रीला प्राधान्य दिले जात असल्याने
शेअर बाजारात नकारात्कम ट्रेण्ड्स पाहायला मिळत आहे. हा ट्रेण्ड सरकारकडून अर्थसंकल्पामधून फारसे काही सकारात्कम मिळण्याची अपेक्षा नसल्याचे दर्शवतो, असे जाणकारांचे म्हणणे आहे.