मोदी सरकारने देशासह सर्वसामान्यांच्या घराचेही बजेट बिघडवले!

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 06 फेब्रुवारी 2021:- मोदी सरकारने देशासह सर्वसामान्यांच्या घराचेही बजेट बिघडवले, अशा शब्दांत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे.

ट्विटरवरुन महागाईसंदर्भात एक बातमी शेअर करत राहुल गांधी यांनी सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. राहुल गांधी म्हणाले, केंद्रीय बजेटच्या महागाईमुळे घरगुती एलपीजी सिलेंडर आणि पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढ झाली आहे.

मोदी सरकारने देशाचे आणि घराचे दोन्हींचे बजेट बिघडवले आहे. राहुल गांधी आणि काँग्रेस पक्षानं केंद्रीय बजेटवरुन वारंवार भाजपावर हल्लाबोल केला आहे.

दरम्यान, केंद्राचं बजेट म्हणजे शेतकरी कायद्यांनंतर सरकारने शेतकऱ्यांवर केलेला आणखी एक हल्ला आहे, असेही राहुल गांधी यांनी शुक्रवारी म्हटले होते.

पेट्रोल-डिझेलवर या शेतकऱ्यांना अधिक खर्च करावा लागणार आहे. मात्र, त्यांना कुठलाही मदतीचा हात सरकारने दिलेला नाही, असेही ते म्हणाले.

अहमदनगर लाईव्ह 24