Budget 2023 : अर्थसंकल्पातील मोदी सरकारचा सर्वात मोठा निर्णय! २०२४ पर्यंत ८० कोटी नागरिकांना मिळणार मोफत रेशन

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Budget 2023 : २०२४ ची लोकसभा निवडणूक पाहता मोदी सरकारकडून यंदाच्या अर्थसंकल्पात अनेक मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पाचव्यांदा देशाचा अर्थसंकल्प जाहीर केला आहे. यामध्ये मोफत रेशनबाबत मोठा निर्णय घेण्यात आला आहे.

मोदी सरकारकडून सध्या अनेक नागरिकांना मोफत रेशन दिले जात आहे. प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना ही पुढील एक वर्षासाठी वाढवण्यात आल्याची घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आली आहे.

मोदी सरकारच्या या निर्णयामुळे आता २०२४ पर्यंत मोफत रेशन मिळणार आहे. केंद्र सरकार 1 जानेवारीपासून राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा (NFSA) अंतर्गत डिसेंबर 2024 पर्यंत 81.35 कोटी लोकांना मोफत रेशनचा लाभ देणार आहे. सुमारे 81 कोटी लोकांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.

लाभ घेण्यासाठी हा पेपर असावा

केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेचा लाभ हा फक्त बीपीएल कार्डधारकांना मिळत आहे. जर या योजनेचा लाभ घेईल असेल तर तुमच्याकडे बीपीएल कार्ड असणे गरजेचे आहे. ही योजना कोरोना काळात सुरु करण्यात आली आहे.

या योजनेद्वारे 4 किलो गहू आणि 1 किलो तांदूळ मोफत मिळतात.

या योजनेंतर्गत बीपीएल कार्डधारकांना दर महिन्याला 4 किलो गहू आणि 1 किलो तांदूळ मोफत दिला जातो. मोफत रेशन योजनेचा पहिला टप्पा 2020 मध्ये सुरू झाला आणि आता केंद्र सरकारने तो डिसेंबर 2024 पर्यंत वाढवला आहे. 2020 पूर्वी केंद्र सरकारने दिलेल्या रेशनसाठी लाभार्थ्यांना किलोमागे 1 ते 3 रुपये द्यावे लागत होते, मात्र आता हे पैसे आकारले जाणार नाहीत.

योजना कधी सुरू झाली?

केंद्र सरकारने प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना ही योजना कोरोना काळात सुरु केली आहे. या काळात गरीब, गरजू, गरीब कुटुंब/लाभार्थ्यांना उपासमारीचा कोणताही सामना करावा लागू नये यासाठी ही योजना सुरु करण्यात आली होती. तिची आता मुदतवाढ केल्याची घोषणा करण्यात आली आहे.