Categories: भारत

लॉकडाउन संपल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मोठे मंदिर बांधणार !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 ,26 मे 2020 :-उत्तरखंडमधील मसुरी मतदारसंघाचे भाजपाचे आमदार गणेश जोशी यांनी लॉकडाउन संपल्यानंतर आपण पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मोठे मंदिर बांधणार असून त्यामध्ये मोदींची मोठी मूर्ती असेल अशी घोषणा त्यांनी केली आहे.

ते दिवसातून १८ तास काम करतात. यावरुनच अंदाज येतो की त्यांच्याकडे कोणती तरी दैवी शक्ती आहे. त्यांच्या प्रती आदर व्यक्त करण्याच्या भावनेमधूनच मी मंदिर बांधण्याचा निर्णय घेतला असल्याचेही जोशी म्हणाले.

रविवारी पार पडलेल्या कार्यक्रमाच्या आधीच त्यांनी शुक्रवारी करोना योद्ध्यांसाठी आयोजित केलेल्या एका कौतुक सोहळ्याच्या कार्यक्रमामध्ये मोदी आरतीची घोषणा केली आहे.

मोदी यांच्या समर्थक असणाऱ्या डॉ. रेणू पंत यांनी ही मोदींची आरती लिहिली असून राज्याचे उच्चशिक्षण मंत्री धन सिंग रावत यांच्या उपस्थितीमध्ये या आरतीसंदर्भात घोषणा करताना आनंद होत आहे

असं जोशी यांनी यावेळी म्हटलं होतं. जोशी यांनी ही घोषणा केल्यानंतर शनिवारी विरोधी पक्ष असणाऱ्या काँग्रेसने यावर आक्षेप घेतला होता. मात्र त्यानंतर दुसऱ्याच दिवशी जोशी यांनी आपण मोदींची आरतीच नाही तर मंदिरही बांधणार आहोत अशी घोषणा केली.

कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूर्यकांत धस्माना यांनी या आरतीवरुन जोशी यांच्यावर टीका केली आहे. “हा अंधभक्तीचा उत्तम नमुना आहे.

एखाद्या कार्यकर्त्याने असं काही केलं असतं तर आम्हाला काहीच हरकत नव्हती. मात्र राज्याचे उच्चशिक्षण मंत्री उपस्थित असणाऱ्या कार्यक्रमामध्ये या आरतीचे प्रकाशन होणे निंदनिय आहे,” असं धस्माना म्हणाले.

इतकच नाही तर या आरतीमुळे हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्या गेल्याचा आरोपही धस्माना यांनी केला आहे. “भगवान हनुमानाच्या आरतीमध्येच मोदींचे नाव टाकून ही आरती बनवण्यात आली आहे,” असं धस्माना यांनी म्हटलं आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

This Story First Publish on Ahmednagarlive24.com

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24