Ahmednagarlive24 Marathi News
Marathi Breaking News, Marathi Live Batmya, मराठी बातम्या

Monsoon2023 Update : मान्सूनबाबत मोठी अपडेट! सर्वसाधारण तारखेपेक्षा यंदा केरळमध्ये उशिरा दाखल होणार मान्सून, जाणून घ्या IMD नवीन अपडेट

Monsoon2023 Update : देशात सध्या उष्णतेचा पारा अधिक वाढला आहे. तसेच सातत्याने तापमानात वाढ होत आहे. मात्र आता लवकरच तुम्हाला या उष्णतेपासून दिलासा मिळू शकतो. भारतीय हवामान खात्याकडून यंदाच्या मान्सूनबाबत मोठी अपडेट देण्यात आली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

मात्र मान्सूनबाबत अपडेट देण्यात आली असली तरीही अनेकनाची काळजी वाढवणारी आहे. IMD ने मान्सून 2023 संदर्भात एक नवीन अपडेट जारी केले आहे. त्यांच्या या नवीन अपडेटनुसार यंदाचा मान्सून उशिरा देशामध्ये दाखल होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

दरवर्षी सर्वसाधारणपणे १ जूनपर्यंत मान्सून केरळमध्ये दाखल होत असतो. मात्र यंदा ४ जूनपर्यंत केरळमध्ये मान्सून दाखल होणार असल्याची शक्यता भारतीय हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.

यंदाचा मान्सून उशिरा दाखल होणार असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. यंदाच्या वर्षी पावसाळा सुरुवयास उशीर होणार असल्याने आता सर्वसामान्य नागरिकांना देखील उष्णतेपासून उशिराच दिलासा मिळणार आहे.

मान्सूनबाबत IMD चा अंदाज काय आहे

उष्णतेमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. मात्र आता हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार लवकरच पाऊस एंट्री करेल. भारतीय हवामान खात्याने त्यांच्या हवामान अंदाजामध्ये सांगितले होते की यावर्षी देशात सामान्य मान्सून असू शकतो.

सरासरी वार्षिक पाऊस 96% असण्याचा अंदाज आहे. केरळमध्ये साधारणपणे १ जून रोजी मान्सून दाखल होतो. पण, यावेळी अल निनोचा परिणाम दिसून येईल. सध्या नवीन अपडेटमध्ये मान्सून ४ जूनपर्यंत दाखल होऊ शकतो, असा विश्वास हवामान खात्याने व्यक्त केला आहे. मात्र, यात आणखी विलंब होण्याचीही शक्यता आहे.

स्कायमेटनेही विलंबाचा अंदाज वर्तवला होता

यंदाच्या मान्सून बाबत खाजगी हवामान संस्था स्कायमेटनेही माणूसन उशिरा सुरु होणार असल्याचा अंदाज वर्तवला होता. स्कायमेटचे संस्थापक- संचालक जतिन सिंग यांच्या मते, 18 मे रोजी उत्तर भारतात हवामानात बदल दिसून येईल. मात्र, १५ दिवसांच्या अंदाजानुसार मान्सूनची सुरुवात कमकुवत होऊ शकते. त्याचबरोबर त्यात विलंब होण्याचीही शक्यता आहे.