दिल्लीच्या शेतकरी आंदोलनास सक्रीय सहभाग नोंदविण्यासाठी शहरातून ट्रॅक्टरचे संचलन

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 27 जानेवारी 2021 :- दिल्ली येथील शेतकरी आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर प्रजासत्ताक दिनी शहरातून अ.भा.किसान संघर्ष समन्वय समिती व महाराष्ट्र राज्य किसान सभेच्या वतीने ट्रॅक्टर तिरंगा रॅली काढण्यात आली.

जय जवान, जय किसानच्या घोषणा देत ट्रॅक्टरवर तिरंगा ध्वज फडकवून मोठ्या संख्येने ट्रॅक्टर रस्त्यावर उतरले होते. केंद्र सरकारने नव्याने पारीत केलेले शेतकरी विरोधी असलेले तीन नवीन कृषी कायदे,

वीज बिल विधेयक २०२० तसेच कामगार विरोधी संहिता रद्द करण्याची यावेळी मागणी करण्यात आली. सकाळी११ वाजता मार्केटयार्ड येथे जमून ट्रॅक्टर तिरंगा रॅली नगर-पुणे महामार्गावर आली.

जुने बस स्थानक जवळील छत्रपती शिवाजी महाराज व मार्केटयार्ड चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन या ट्रॅक्टर रॅलीची सुरुवात झाली.

दोन महिन्यापासून दिल्लीच्या सिमांवर आंदोलन करणार्‍या शेतकर्‍यांची दखल न घेणार्‍या केंद्रातील मोदी प्रणित भाजप सरकारचा निषेध नोंदवून जोरदार निदर्शने करण्यात आली.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24